शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : मायरा वायकुळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भर गर्दीत तिच्या एका कृतीने सगळ्यांचीच जिंकली मनं, नेटकरी म्हणाले, “संस्कार खूप…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 16, 2023 | 11:15 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Myra Vaikul And CM Eknath Shinde

Video : मायरा वायकुळने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट, भर गर्दीत तिच्या एका कृतीने सगळ्यांचीच जिंकली मनं, नेटकरी म्हणाले, "संस्कार खूप…"

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप पाडत प्रेक्षकांची लाडकी ठरलेली चिमुरडी म्हणजे मायरा वायकुळ. सोशल मीडिया स्टार असलेल्या मायराने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिने साकारलेली परीची भूमिका रसिक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या मराठी मालिकेतून लोकप्रियता मिळवल्यानंतर मायराने आपली पावलं हिंदी सिनेसृष्टीकडे वळविली. हिंदी मालिकेच्या प्रेक्षकांनाही या चिमुरडीने भुरळ घातली. (Myra Vaikul And CM Eknath Shinde)

अभिनयाव्यतिरिक्त मायराचा सोशल मीडियावरील वावर खूप मोठा आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी मायरा तिचे अनेक फोटोज व व्हिडिओज तिच्या चाहत्यांबरोबर नेहमीच शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवानिमित्त मायराच्या अनेक व्हिडीओंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मायराच्या घरीही बाप्पा विराजमान झाले होते, त्यावेळी बाप्पाच्या आगमनाचा व्हिडीओ, बाप्पाला गाऱ्हाणं घालतानाचा व्हिडीओ तसेच बाप्पाच्या विसर्जनावेळचा व्हिडीओ तिने शेअर केला होता.

आणखी वाचा – Video : “मी योग्यवेळी येऊन…”, क्रांती रेडकरच्या मुलीने कापले स्वतःचेच केस; म्हणाली, “काय तर म्हणे…”

त्यानंतर आता मायराच्या आणखी एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मायराने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने “ग्रेट भेट मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, श्री. एकनाथ शिंदे साहेब”, असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये मायराने मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचं दिसतंय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनीही चिमुकल्या मायराची विचारपूस केल्याचं कळतंय. तर त्यावेळी मायराने मुख्यमंत्र्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळालं.

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

आणखी वाचा – मुग्धासह तिच्या बहिणीचंही लग्न ठरलं! केळवणाचे फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी, म्हणाली, “माझं आणि ताईचं…”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मायरा वायकुळच्या भेटीदरम्यानचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान मायराने नमस्कार करून आशीर्वाद घेतल्याची कृती पाहून अनेकांनी चिमुकल्या मायरा वरील संस्कारांचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “संस्कार खूप छान दिले आहेत मायराला”, तर अनेकांनी मायराच्या या व्हिडिओला हार्ट ईमोजी देत कमेंट्स करत पसंती दर्शविली आहे. सध्या मायरा ‘नीरजा – एक नई पहचान’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.

Tags: child artistcm eknath shindeeknath shindeentertainmentmarathi actressmukhymantri eknath shindemyra vaikul
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Ranveer Singh On Deepika Padukon

'सिंघम अगेन'मध्ये महिला पोलिसाच्या भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण, लूक पाहून नवऱ्याची मराठीत पोस्ट, म्हणाला, "आली रे आली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.