शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रवी जाधव यांचा भाऊ अजूनही चालवतो रिक्षा, भावाबाबत बोलताना दिग्दर्शकाचे डोळे पाणावले, म्हणाले, “मला झोप लागत नाही कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2023 | 7:04 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
ravi jadhav share a memories about him family

ravi jadhav share a memories about him family

मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेल्या चित्रपटांपैकी ‘नटरंग’, ‘टाईमपास’ किंवा ‘न्यूड’ असो यांसारखे विविध चित्रपट साकारत दिग्दर्शक रवी जाधव यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. त्यांचं नाव मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. त्यांचा दिग्दर्शक बनण्यापर्यंतचा प्रवास खूप संघर्षमय होता. त्यामुळेच कदाचित त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना अगदी भावतात. त्यांची ‘ताली’ या बेवसिरिजने तर प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळवलं होतं. रवि नुकतेच ‘सारेगमप’ ‘लिटल चॅप्स’च्या मंचावर आले होते. या कार्यक्रमाचा मैत्री स्पेशल भागानिमित्त त्यांनी आपल्या कुटुंबाबाबत वक्तव्य केलं. (ravi jadhav share a memories about him family)

‘सारेगमप लिटल चॅप्स’ या कार्यक्रमात विविध पाहुणे मंडळी हजेरी लावतात. यावेळी विविध मंडळींनी हजेरी लावली त्याचबरोबर रवि जाधवही यावेळी उपस्थित होती. ‘मैत्री स्पेशल’ भागात त्यांच्या मित्राचा व्हिडिओ त्यांच्यासाठी भेट म्हणून दाखवण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील मित्रासारख्या मोठ्या भावाबद्दल सांगितलं तसंच त्यांच्या कुटुंबाबाबतही वक्तव्य केलं.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Ind Vs Pak Match : भारत-पाकिस्तान मॅचवरून नेटकऱ्यांना आठवला जेठालाल, सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल

रवि म्हणाले, “मी सिनेमात काम करतो. मला आता लोक ओळखतात. पण माझं घर अजून साधं आहे. माझा भाऊ अजूनही रिक्षा चालावतो. माझा भाऊ असा पहिल्यांदा टिव्हीवर आला असेल.  माझा मधला भाऊ महेंद्र तो ही एका साध्या कंपनीत काम करतो. त्यामुळे घरी गेल्यावर कधी चित्रपट नसतो. मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या कुटुंबाला अजूनही मी नक्की काय करतो हे माहित नाही. त्यामुळे मी अजून तसाच आहे. मी अजून जराही बदललो नाही. जसा आधी होतो नटरंगच्याही आदी अजूनही तसाच आहे”.

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

आणखी वाचा – “त्यांना सांगणं चुकीचं होतं का असं…”, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना हेमांगी कवीबरोबर नेमकं काय घडलं?, म्हणाली, “अर्ध्या तासामध्येच मी…”

रवि पुढे सांगतात, “माझा सर्वात मोठा भाऊ ज्याला मी असंख्य वेळा म्हटलं की अमुक गाडी घेतो तर जूनी गाडी तुला देऊ का? तु काही तरी नवीन चालू करशील. तर त्याचं म्हणण असं आहे की, सकाळी मुलांना रिक्षात सोडलं की मला दुपारी घरी येऊन छान झोप लागते. मी खूप आनंदी आहे. मला असं वाटतं की त्याला झोप लागते पण मला नाही. तो माझ्यापेक्षाही आनंदी आहे. तर मी त्या आनंदाच्या शोधात आहे”, असं सांगत रवि यांनी आपल्या कुटुंबातील साधेपणा अजूनही टिकून असल्याबाबत सांगितलं.

Tags: family momentMarathi movie directorravi jadhavsa re ga ma pa little champ program
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Khatron ke Khiladi 13 Grand Finale

गायक डीनो जेम्सने पटकावले 'खतरों के खिलाडी'च्या १३ व्या पर्वाचे विजेतेपद, 'या' मराठमोळ्या अभिनेत्याला टाकलं मागे, मिळाली ट्रॉफी, कार व इतकी रक्कम

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.