शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटातून प्रसिद्ध झालेली बॉलिवूड अभिनेत्री गायत्री जोशी सध्या एका कारणाने चर्चेत आली आहे. ती म्हणजे तिच्या कारचा नुकताच झालेला अपघात. या अपघातात जरी ती व तिचे पती बचावले असले, तरी एका वृद्ध दाम्पत्याचा यात जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता याप्रकरणी तिच्या पतीची स्थानिक पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचदरम्यान, अभिनेत्रीचा अपघातानंतर एक फोटोदेखील समोर आला आहे. (Gayatri Joshi Car Accident Photo)
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, गायत्री व तिचा पती विकास ओबेरॉय इटलीतील एका कार शर्यतीत सहभागी झाले होते. यावेळी दाम्पत्यांच्या लॅम्बोर्गिनी कारने एका कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक केली आणि पुढे असलेल्या फेरारीला ती धडकली. पुढे कॅम्पर व्हॅनला धडकल्यानंतर त्या फेरारीने लगेच पेट घेतला. ज्यामुळे त्या कारमध्ये असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सध्या या घटनेची चौकशी सुरु आहे.
हे देखील वाचा – Video : बेशुद्ध अवस्थेतील व्यक्तीचा गुरमीत चौधरीने वाचवला जीव, व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुकाचा वर्षाव
Two deaths on a Ferrari in Sardina, Italy pic.twitter.com/skT3CaXg0T
— Globe Clips (@globeclip) October 3, 2023
अपघातानंतर गायत्रीने मी व माझा पती सुखरूप असल्याची माहिती एका माध्यमाला दिली होती. दरम्यान, स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असून यावेळी या दाम्पत्याची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर विकास यात दोषी आढळले, तर त्यांना ७ वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असे वृत्तदेखील समोर येत आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक फोटो नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये ती अपघातानंतर पूर्णपणे स्तब्ध झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर ती रस्त्यावर बसून चक्काचूर झालेल्या कारकडे पाहताना दिसली आहे.
हे देखील वाचा – Video: बोल्ड संवाद, कॉमेडी अन्…; ‘बॉईज ४’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, गौरव मोरेचा लूक पाहून सर्वत्र होतंय कौतुक

२००४ मध्ये गायत्रीने शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिची भूमिका प्रचंड गाजली असून तिला या भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहे. मात्र, यानंतर गायत्रीने उद्योगपती विकास ओबेरॉयसह लग्न केले आणि हे क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीचा पती भारतातील सर्वात श्रीमंत टायकूनपैकी एक असून त्यांचे देशभरात अनेक लक्झरी गृहप्रकल्प सुरू आहेत.