शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गौतमी पाटीलला कोकणात प्रवेश नाही, कार्यक्रमाला विरोध, पण यामागचं नेमकं कारण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 4, 2023 | 6:52 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
gautami patil no entry in sindhudurg

gautami patil no entry in sindhudurg

वाढदिवसाची जंगी पार्टी असो वा राजकीय कार्यक्रम, सध्या सगळीकडेच गौतमी पाटीलची हवा पाहायला मिळते. सबसे कातील गौतमी पाटील म्हणत गौतमीने आपल्या मोहक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला घायाळ केलं आहे. त्यामुळे तिचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे. सगळीकडे तिचा इतका क्रेझ असताना मात्र अशातच अनेक ठिकाणांहून तिचा विरोध होतानाही दिसत आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीच्या कार्यक्रमाला कोल्हापुरात तुफान विरोध झाला होता. आता त्यानंतर कोकणातही सिंधुदुर्गमध्ये गौतमीला नो एण्ट्री करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात आयोजित करण्यात आलेला गौतमीचा लावणी शो रद्द करण्यात आला आहे. याबाबतचे पोस्टर सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहे. (gautami patil no entry in sindhudurg)

सिंधुदुर्गातील ७ – ८ ऑक्टोबरला कुडाळ व कणकवली तालुक्यांमध्ये गौतमीचा डीजे डान्स शो आयोजित करण्यात आले होते. ८ ऑक्टोबरला कुडाळमध्ये मराठा समाज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार होता. तर कणकवलीत वसंतराव आचरेकर प्रतिष्ठाण येथे सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे निमंत्रण व्हायरल होत असताना, आता अनेकांनी याला जोरदार विरोध केला. ‘भगवान परशुरामाच्या पावन भूमीत असा कार्यक्रम होऊ देणार नाही’, असं म्हणत या कार्यक्रमासाठी विरोध दर्शवण्यात आला. या विरोधानंतर आता आयोजकांनी तांत्रिक कारण देत हा कार्यक्रम रद्द केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

आणखी वाचा – “आम्हीच नंबर वन”, टीआरपीच्या खोट्या बातम्यांवर जुई गडकरीचा संताप, ‘प्रेमाची गोष्ट’बाबत विचारताच म्हणाली, “चुकीच्या गोष्टी…”

गौतमीचा कार्यक्रम रद्द झाला असला तरी ७ ऑक्टोबरला कॉमेडीचे सुपरस्टार हा कार्यक्रम मात्र होणार आहे. या कार्यक्रमाला छोट्या पडद्यावरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कालाकार हजेरी लावणार आहेत. आता या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीलाही सुरुवात झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Gautami Patil (@official_gautami941__)

आणखी वाचा – किंग खान शाहरुखच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटात झळकणार होता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर; पण झालं असं की…

सध्या गौतमी पाटीलची हवा संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. पण आता गौतमी लवकरच एका वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. लवकरच गौतमीचा एक नवा कोरा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘घुंगरू’ या चित्रपटातून गौतमी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं रंजक ठरणार आहे.    

Tags: gautami patilKonkan sindhudurgLavani dancerno entry
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
shivani rangole shared 5th standard work video

Video: पाचवीत असताना अशी दिसायची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळे, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.