शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : क्रांती रेडकरने पहिल्यांदाच दाखवली तिच्या जुळ्या मुलींची झलक, व्हिडिओ पाहून सेलिब्रिटीही करत आहेत कौतुक

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 3, 2023 | 5:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar reveals her daughter's face

क्रांती रेडकरने पहिल्यांदाच दाखवली तिच्या जुळ्या मुलींची झलक

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री क्रांती रेडकर ही विविध कारणांनी सतत चर्चेत असते. जरी ती अभिनय करताना दिसत नसली, तरी मनोरंजन क्षेत्रातील तिचा वावर कायम पाहायला मिळतो. क्रांती केवळ अभिनेत्रीच नव्हे, तर निर्माती, दिग्दर्शिका, नृत्यांगना, उद्योजिका, सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटर अश्या अनेक भूमिका ती यशस्वीरीत्या पार पाडताना दिसते. शिवाय, नुकतंच पार पडलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात ती परिक्षिकेच्या भूमिकेत दिसली. त्याचबरोबर ती दोन जुळ्या मुलींची आई असून तिच्या लेकींचे अनेक गोड क्षण चाहत्यांसह नेहमी शेअर करत असते. मात्र, त्या सर्व पोस्ट्समध्ये तिने कधीच त्यांचा चेहरा दाखवला नाही. मात्र, आता क्रांतीने एक रील पोस्ट करत पहिल्यांदाच तिच्या लेकींचा चेहरा चाहत्यांसमोर आणला. (Kranti Redkar reveals her daughter’s face)

क्रांती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती तिच्या कामाबरोबर खासगी आयुष्यातील अनेक रील्स सोशल मीडियावर शेअर करते. क्रांतीने सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी लगीनगाठ बांधली. दोघांना झिया व झायदा या दोन जुळ्या मुली असल्या, तरी ते त्यांना लाडाने गोदू आणि छबील अशी हाक मारतात. त्यामुळेच तिचे चाहतेदेखील तिच्या मुलींना याच नावाने ओळखतात. अभिनेत्री तिच्या मुलींबरोबर खेळतानाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. असाच एक व्हिडिओ क्रांतीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या मुलींची एक छोटीशी झलक दाखवली आहे.

हे देखील वाचा – Raavsaaheb Teaser : “देशाची सिस्टीम बिघडली की…”, ‘रावसाहेब’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, मराठीतील टॉप अभिनेत्रींची अंगावर काटा आणणारी झलक

क्रांतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तिच्या मुलींचा चेहरा प्रथमच समोर आणला. घराच्या खिडकीजवळ काढण्यात आलेल्या या व्हिडिओत त्या एकमेकींबरोबर खेळताना, एकमेकींना मिठी मारताना आणि गोड पापा देताना दिसल्या. हा व्हिडिओ शेअर करताना “संध्याकाळचे दृश्य” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.

हे देखील वाचा – उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल, ती व्यक्ती नेमकी कोण?

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

क्रांतीने हा व्हिडिओ शेअर करताच चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट करत आपलं प्रेम दर्शवलं आहे. या व्हिडिओवर अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट करत म्हणाली, “किती सुंदर तो पापा”. तर मेघना एरंडे म्हणाली, “खूपच गोड आहेत या मुली”. त्याचबरोबर चाहत्यांनीही क्रांतीच्या मुलींवर कमेंटद्वारे भरभरून प्रेम दिलं.

Tags: instagram videokranti redkarkranti redkar daughterKranti Redkar reveals her daughter's face
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Me nathuram godse boltoy Marathi play on stage again

रंगभूमीवर रंगणार ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ असा प्रयोग; एका नाटकात शरद पोंक्षे तर दुसऱ्या नाटकात ‘हा’ कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.