सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Raavsaaheb Teaser : “देशाची सिस्टीम बिघडली की…”, ‘रावसाहेब’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, मराठीतील टॉप अभिनेत्रींची अंगावर काटा आणणारी झलक

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 3, 2023 | 2:59 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Raavsaaheb Movie Teaser

'रावसाहेब' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून विविध विषयांवर आधारित अनेक दर्जेदार चित्रपट येत आहे. पूर्वी केवळ कौटुंबिक आणि विनोदी चित्रपटपुरती ओळखली जाणारी ही चित्रपटसृष्टी आता कात टाकताना दिसते. सामाजिक, ऐतिहासिक चित्रपटांबरोबर आता रहस्यमय चित्रपटसुद्धा मराठीमध्ये येत आहे. अशातच एक नवा रहस्यमय चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘रावसाहेब’ असं या चित्रपटाचं नाव असून नुकतंच याचा टीझर समोर आला आहे. (Raavsaheb Movie Teaser)

‘रावसाहेब’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री मुक्त बर्वे व सोनाली कुलकर्णी प्रथमच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. त्याचबरोबर जितेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, रश्मी अगडेकर हेसुद्धा चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. टीझरची सुरुवात एका घनदाट जंगलाने होते. ज्यामध्ये हे कलाकार अत्यंत भयभीत अवस्थेत दिसत आहे. तगडी स्टारकास्ट आणि टीझरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून ‘रावसाहेब’बद्दल प्रेक्षकांना मोठी उत्सुकता लागली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक निखिल महाजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तर प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे लिखित या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे यांनी केली आहेत.

हे देखील वाचा – “आई भारतामध्ये फक्त…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावला तिच्या लेकाने इंग्रजीमध्ये न बोलण्याची दिली ताकीद, अभिनेत्री म्हणाली, “खंत वाटते की…”

दिग्दर्शक निखिल महाजन या चित्रपटाबद्दल म्हणाले, “‘रावसाहेब’च्या निमित्ताने आम्ही रहस्यमय कथानकाच्या शैलीची परिभाषा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. ही अशी कथा आहे जी प्रेक्षकांना भयभीत करण्यासोबतच खिळवूनही ठेवेल. प्रत्येक फ्रेममध्ये परिपूर्णतेचा प्रयत्न हा ‘रावसाहेब’ला खऱ्या अर्थाने वेगळे करतो. ग्राउंडब्रेकिंग व्हिज्युअल तयार करण्यासाठी आम्ही महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहेत. आमच्या या रोमांचक प्रवासात प्रेक्षकही सहभागी होतील यात शंका नाही.”

हे देखील वाचा – Video : महाराष्ट्र शासनाकडून रौप्य पदक देत निवेदिता सराफ यांचा सन्मान, म्हणाल्या, “हा सन्मान माझा नसून…”

तर निर्माते अक्षय बर्दापूरकर यावेळी म्हणाले, “या चित्रपटाच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा निखिल महाजन यांच्यासह काम करण्याची संधी मिळाली. निखिलबरोबर काम करताना मी नेहमीच उत्सुक असतो. एकतर आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि आम्ही दोघेही औरंगाबादचे आहोत. त्यात निखिलचे विषय हे नेहमीच चौकटीबाहेरचे असतात. त्या चित्रपटांमध्ये भावना असतात. हा सुद्धा एक वेगळा आणि संवेदनशील विषय आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम कमाल असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.”

Tags: jitendra joshimukta barveRaavsaaheb Teaserraavsaheb teasersonalee kulkarniupcoming marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
Urfi Javed got engaged

उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा? 'ते' फोटो सोशल मीडियावर व्हायरल, ती व्यक्ती नेमकी कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.