शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात झळकलेली प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती तिच्या लग्नामुळे. गेल्या अनेक दिवसांपासून माहिराच्या लग्नाची चर्चा सुरु होती. ती अखेर खरी ठरली आहे. माहिरा तिचा प्रियकर सलीम करीमसह विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे व्हिडिओज नुकतेच समोर आले असून चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे. (Mahira Khan Second Marriage)
बिझनेसमन असलेला सलीम व माहिरा गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर काल हे दोघे विवाहबंधनात अडकले. माहिराचे हे दुसरं लग्न आहे. याआधी तिने अभिनेता, निर्माता अली अक्सरीबरोबर २००७ मध्ये पहिले लग्न केले होते. दोघांना एक मुलगादेखील आहे. मात्र, काही वैयक्तिक कारणास्तव २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आता ती पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकली असून अभिनेत्रीने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
हे देखील वाचा – Video: “लहानपणी ही तू सुरातच रडायचास…”, ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर सागर कारंडे घेऊन आला सुरेश वाडकरांसाठी खास व्यक्तीचं पत्र
मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाहसोहळा पार पडला. अभिनेत्रीचा मॅनेजर अनुशय तलहा खान याने या लग्नाचे व्हिडिओज शेअर केले. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये माहिरा पेस्टल रंगाचा लेहेंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी तिने आपला चेहरा झाकला होता. तर सलीमने काळ्या रंगाची शेरवानी त्यावर निळ्या रंगाची पगडी असा पेहराव केला होता. यावेळी माहिराची एन्ट्री होताच तिच्या पतीला अश्रू अनावर झाले होते. या शाही विवाहाचे व्हिडिओज व्हायरल होत असून चाहते या जोडप्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत.
हे देखील वाचा – राघवचा फटका, परिणितीचा उत्साह अन्…, शाही विवाहापूर्वी चोप्रा व चड्ढा कुटुंबियांमध्ये रंगला क्रिकेटचा सामना, फोटो व्हायरल
My heart ????
— ~ɐuıH~ (@DarGaeKya) October 1, 2023
May this be the beginning of a beautiful life ahead for you! You deserve every ounce of happiness #MahiraKhan pic.twitter.com/7DHBIjHTGf
अभिनेत्रींच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातून माहिराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, त्यानंतर ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात ती दिसली नाही. तिने अनेक पाकिस्तानी मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेलं असून तिची पाकिस्तानी मालिका ‘हमसफर’ प्रचंड गाजली आहे.