मराठीतीली सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री सुकन्या मोने यांचं नाव आदराने घेतलं जातं. आजवर त्यांनी चित्रपट, मालिकांमध्ये केलेलं काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडलं. मालिकांमध्ये त्या साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांना आपलसं करुन घेतात. खऱ्या आयुष्यात सुकन्या नेमक्या कशा आहेत? हे जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना अधिक रस असतो. सुकन्याही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे त्यांच्या खासगी आयुष्यातील प्रत्येक क्षण चाहत्यांबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करतात. मध्यंतरी तर त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे अनेक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामद्वारे शेअर केले होते. त्यांचा या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Sukanya Mone Troll)
काही महिन्यांपूर्वी सुकन्या मोने यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत हा चित्रपट यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला. यानिमित्त आयोजित एका पार्टीत चित्रपटाच्या यशाचं सेलिब्रेशन करताना सुकन्या यांनी एक भन्नाट डान्स केला होता. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी सुकन्या यांच्या डान्सचे भरूभरून कौतुक केले होते.
दरम्यान, याच व्हिडिओवर एका महिलेने “she is over drunk” म्हणजे “जास्त दारू प्यायली का?” अशी एक कमेंट केली. या कमेंटवर सुकन्या यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या, “संगीताची नशा, यशाची नशा आहे ही… बाकी काही नाही”. नेटकऱ्याच्या कमेंटला त्यांनी दिलेलं उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
हे देखील वाचा – Video : परिणीती चोप्रा-राघव चड्ढाचं असं पार पडलं शाही लग्न, व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, अभिनेत्रीचा भाऊ रडला अन्…

अभिनेत्री सुकन्या मोने या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात आपल्याला पाहायला मिळाल्या होता. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. नुकतंच त्यांनी एका चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण केलं असून सध्या त्या कुटुंबियांसह वेळ घालवताना दिसत आहेत.