बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा ‘टायगर ३’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ‘एक था टायगर’ चा तिसरा भाग असलेल्या या चित्रपटाची घोषणा जेव्हा झाली, तेव्हापासूनच चाहते याच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. अशातच निर्मात्यांनी नुकताच ‘टायगर ३’चा जबरदस्त टीझर प्रदर्शित केला आहे. चित्रपटाचा टीझर चित्रपटप्रेमींच्या पसंतीस पडत असून सोशल मीडियावर तो ट्रेंडिंगमध्ये आला आहे. (Tiger 3 Teaser)
१ मिनिट ४५ सेकंदाच्या या टीझरमध्ये सलमान खान एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर ‘टायगर’च्या दोन भागांचा फ्लशबॅकसुद्धा या टीझरमध्ये दाखवण्यात आला आहे. टीझरच्या सुरुवातीला टायगर आपली ओळख करताना दिसत आहे. “मेरे बेटे को मैं नहीं इंडिया बोलेगा कि उसका बाप क्या था, गद्दार या देशभक्त…” असं म्हणत टायगर देशवासियांकडून त्याच्या देशभक्तीचा पुरावा मागत असल्याचे त्या टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे. भरपूर ऍक्शन सीन्सने भरलेला हा टीझर प्रेक्षकांना भावला आहे. टीझर प्रदर्शित होताच अवघ्या काही मिनिटांमध्येच याला लाखो व्ह्युज मिळाले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा रंगत आहे.
हे देखील वाचा – परिणीती चोप्राचं मंगळसूत्र तुम्ही पाहिलंत का?, बहिण प्रियांका चोप्राशी काय आहे कनेक्शन?, खास डिझाइनने वेधलं लक्ष
दरम्यान, हा चित्रपट म्हणजे सलमानचं रुपेरी पडद्यावर जोरदार कमबॅक असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. “जब तक टाइगर मरा नहीं, तब तक टाइगर हारा नहीं”, असं कॅप्शन त्याने या पोस्टमध्ये दिलं आहे. या चित्रपटात सलमानसह कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘यशराज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत याची निर्मिती होत असून चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलं आहे. दिवाळीत हा चित्रपट हिंदी, तमिळ व तेलुगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा – “हळद, मेहंदी सारखे कार्यक्रम…” कविता लाड-मेढेकर यांनी सांगितला खऱ्या आयुष्यातील लग्नाचा किस्सा, म्हणाल्या, “माझ्या घरी…”
याआधी, सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट आला होता. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला होता. त्यामुळे चित्रपटप्रेमींना त्याच्या या चित्रपटाकडून बरीच अपेक्षा आहे. चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना आवडला आहे. पण प्रदर्शनांनंतर चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.