‘बिग बॉस’ फेम राहुल वैद्य व टीव्ही अभिनेत्री दिशा परमार यांच्या घरी नुकतंच चिमुकलीचं आगमन झालं आहे. चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० सप्टेंबरला दिशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर दिशा व बाळाला डिस्चार्ज मिळाला त्याच दिवशी राहुलचा वाढदिवस होता. त्यामुळे या जोडीने बाळासह सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शनही घेतलं. त्यानंतर घरी त्यांचं आजी-आजोबांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. याचा व्हिडिओ नुकताच राहुलने सोशल मीडियावर शेअर केला आहेत. (Rahul disha daughter grand welcome)
दिशाने बाळाला जन्म दिल्यानंतर ही बातमी राहुलने ‘घरी लक्ष्मी’ आली असं म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक, कमेंटचा करत शुभेच्छांचा वर्षाव केला. तेव्हापासून राहुल व दिशा यांच्या राजकुमारीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होते.
आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘जवान’ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई, आतापर्यंत कमवले तब्बल इतके कोटी
नुकताच राहुलने लेकीच्या स्वागताचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण हा व्हिडिओ मुलीचा चेहरा दिसणार नाही अशाप्रकारे चित्रित करण्यात आला. व्हिडिओ शेअर करत राहुल लिहीतो, ‘आमच्या आयुष्यातला सर्वात खास दिवस म्हणजे २३ सप्टेंबर २०२३ हा आहे. पत्नी व लेक घरी आली. यापेक्षा जास्त मी वाढदिवसादिवशी काहीच मागू शकत नाही. यावर्षी गणेश चतुर्थीला आमच्या घरी लक्ष्मी आली आहे. यावेळी आजी, आजोबा व आत्याने ओवाळून तिचं घरी स्वागत केलं’, असं लिहीत पुढे त्याने यादिवशी सजावट करणाऱ्यांचेही आभार मानले.
व्हिडिओमध्ये दिशा व बाळाचं स्वागत करण्यासाठी खूप छान सजावट करण्यात आली होती. बाळाची आजी संपुर्ण घरात दिवे लावताना दिसली. बाळाच्या स्वागतासाठी खास टेडी बियर, छोटे कपडे अशा सुंदर वस्तूंनी घराचा एक कोपरा सजवण्यात आला होता. आजीने आई-बाबांसह छोट्या राजकुमारीचं औक्षण करत स्वागत केलं. घरी आल्यानंतर दिशाच्या सासूने एक सुंदर हार देत तिला आई झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत राहुल-दिशाला आईबाबा झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसंच कलाकार मंडळीनीही कमेंट करत त्यांच्या आनंदात सहभागी झाले. गायक अमित टंडन याने कमेंट करत, ‘राहुल तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे खूप अभिनंदन. छोटी राजकुमारी तुम्हाला प्रेम देईल. तु बाप बनलास’, असं म्हणत त्याला शुभेच्छा दिल्या. तर एक नेटकऱ्याने, ‘दिशाने तिच्या छोट्या राजकुमारीला दिलेलं किस हा त्या रिलमधील सर्वात सुंदर क्षण होता. मुलगी झाल्याबद्दल तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन’, असं लिहित त्या व्हिडिओतील मोहक क्षणाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.