ओटीटी विश्वात यंदा ‘बिग बॉस ओटीटी’ या प्रसिद्ध रिऍलिटी शोची जोरदार चर्चा झाली आहे. कारण, या शोच्या दुसऱ्या पर्वात मनोरंजनविश्वातील कलाकारांसह अनेक प्रसिद्ध युट्युबर झळकले होते. याच शोमध्ये युटूबर व व्लॉगर एल्विश यादवने वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून शोमध्ये एन्ट्री केली व त्या पर्वाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला होता. एल्विशला बिग बॉसची ट्रॉफी आणि २५ लाख रुपयांचं बक्षिस मिळालं होतं. हा शो संपून बरेच दिवस झाले. मात्र, अजूनही एल्विशला विजेतेपदाची रक्कम मिळाली नसून त्याचा खुलासा नुकताच एका मुलाखतीत केला आहे. (Elvish Yadav talks about Bigg Boss OTT 2)
‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता एल्विशने नुकताच अभिनेत्री शहनाज गिलच्या ‘देसी वाइब्स’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने बिग बॉसमधील प्रवास व अन्य गोष्टींचा खुलासा करताना ‘बिग बॉस ओटीटी’च्या निर्मात्यांनी आपल्याला बक्षिसाची रक्कम दिली नसल्याचं सांगितलं आहे. शहनाजने “तुझ्याकडे पहिल्यापासून तीन मोबाईल आहे, चौथा मोबाईल कधी घेणार?” असा प्रश्न विचारला असता एल्विश त्यावर म्हणाला, “जेव्हा मला ‘बिग बॉस ओटीटी’चे निर्माते बक्षिसाची रक्कम देतील, तेव्हाच मी माझा चौथा मोबाईल घेईन.” यावर शहनाज चकित होत म्हणाली, “तुला अजूनही पैसे मिळालेत नाही, हे चुकीचं आहे.’
हे देखील वाचा – Video : बायको पाय घसरून पडताच सिद्धार्थ चांदेकरला हसू अनावर, मजेशीर व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “धसमुसळी बायको…”
पुढे त्याने ‘बिग बॉस ओटीटी’मधील किस्से सांगताना एक धक्कादायक खुलासा देखील केला आहे. तो म्हणाला, “आधी मला वाटलं होतं की, वाईल्ड कार्डमध्ये प्रवेश करणाऱ्यांना कधीच ते विजेते बनवत नाही, असा त्यांचा नियम असेल. पण जेव्हा मी या शो प्रवेश करण्याची संधी मिळाली, तेव्हा मी त्यांना शंभर वेळा विचारलं की, भाऊ जेव्हा मला मत मिळतील तेव्हाच मी जिंकेल ना? मला आशा आहे की, असा कुठलाही नियम नसणार.” त्यावर निर्माते म्हणाले, “जेव्हा तुला जास्त मतं मिळतील, तेव्हाच वाईल्ड कार्ड स्पर्धकांना विजेता बनवतील.”
हे देखील वाचा – “कित्येकदा एका नजरेने…”, ‘थ्री इडियट्स’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनानंतर पत्नीची पहिली पोस्ट, म्हणाली, “नेहमीच तू माझा होतास आणि…”
युट्युबर एल्विश यादवने कन्टेन्ट क्रिएटर अभिषेक मल्हानला हरवत विजेतेपद पटकावले होते. ‘बिग बॉस’ नंतर तो अनेक कार्यक्रमांमध्ये झळकला आहे. नुकतंच त्याचं एक गाणं प्रदर्शित झालं होता. या गाण्यात अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासह स्क्रीन शेअर केली असून या गाण्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे.