शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘या’ गोष्टींमध्ये महिलावर्गालाही मागे टाकतात शंतनू मोघे, स्वतःच खुलासा करत म्हणाले, “एकवेळ बायका…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 6, 2023 | 3:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shantanu moghe do more shopping

Shantanu moghe do more shopping

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या मनामनात पोहोचवणारे कलाकार म्हणजे शंतनू मोघे. त्यांनी साकारलेल्या महाराजांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी विशेष कौतुक केलं. ते ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमध्येही झळकले होते. पण शंतनू यांनी साकारलेली महाराजांची भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरली. त्यांनी आजवर अनेक विविध भूमिका साकारल्या आहेत त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग बराच मोठा आहे. त्यांच्याविषयी जाणून घेणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं. शंतनूच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आहेत. त्यातील एक वेगळी आवड त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितली.(Shantanu moghe do more shopping)

शंतनू यांनी मराठी कलासृष्टीत आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. ते सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या वेगळ्या आवडीबद्दल भाष्य केलं. ते त्याबद्दल सांगतात, “मला बऱ्याच गोष्टी आवडतात. त्यातील एक गोष्ट म्हणजे शॉपिंग. मी न थकता शॉपिंग करू शकतो. मजेची गोष्ट म्हणजे पुरुषांना याची आवड नसते. पण मी मात्र एखादी गोष्ट मिळवण्यासाठी न थकता शॉपिंग करु शकतो. मला वेगळ्या गोष्टींचं कलेक्शन करायला आवडतं. त्यामुळे माझ्या घरात तुम्हाला अशा गोष्टी बऱ्याच दिसतील”.

आणखी वाचा – “करिअर उद्धवस्त कारण…”, ऐश्वर्या रायबरोबरच्या नात्यावर विवेक ओबेरॉयचा २० वर्षांनी खुलासा, म्हणाला, “रिलेशनशिपबाबत…”

याबद्दलचा एक किस्सा सांगताना ते म्हणाले, “ आम्ही एक गोष्ट घ्यायला क्रॉफर्ड मार्केटला गेलो होतो. तिथल्या दुकानात ती गोष्ट नव्हती. त्या दुकानादाराने आम्हाला दुसरा पत्ता दिला. तो पत्ता शोधत शोधत आम्ही तिथे पोहोचलो खरे पण त्यांच्याकडे आम्हाला हवी तशी वस्तू नव्हती. आम्ही तिथे थांबून दुकानदाराला सांगून हवी तशी करुन घेतली. पण ती गोष्ट घेतल्याशिवाय आम्ही काही घरी काही गेलो नाही”.

View this post on Instagram

A post shared by Shantanu S. Moghe (@shantanusmoghe)


“मला शॉपिंग खूप जास्त आवडते. एकवेळ बायका थकतील पण मी नाही. त्यांच्यापेक्षा जास्त मी शॉपिंग करु शकतो. एवढं मात्र नक्की! त्यामुळे माझ्या घरात अशा विविध गोष्टी दिसतील. माझ्या बायकोलाही याची आवड आहे त्यामुळे आम्ही दोघे मिळून हा पसारा गोळा करतो”, स्वतःच्या या वेगळ्या आवडीबद्दल शंतनू यांनी खुलासा केला.शंतनू मालिकांमध्ये दिसतातच पण त्यांचा नाटकांकडेही बराच कल आहे. सध्या शंतनू नाटकांच्या प्रयोगात व्यग्र असून त्यांच्या ‘सफरचंद’ या नाटकाचा प्रयोग सुरु आहे.

Tags: marathi actressmore shoppingShantanu moghe
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Prasad oak speak on maharashtrachi hasya jatra show

“…तर कलाकार म्हणून माझा अपमान होईल”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बाबत बोलताना असं का म्हणाला होता प्रसाद ओक?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.