कलाकारांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे त्यांच्या फिटनेसकडे साऱ्यांचं आधी लक्ष जातं. कलाकार मंडळी हे स्वतःच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. प्रत्येकाची फिटनेसबद्दलची व्याख्या ही निराळी असते. एव्हरग्रीन अभिनेते अशोक सराफ यांचीही फिटनेसची व्याख्या निराळी आहे. अशोक सराफ यांनी चक्क व्यायाम करणंच सोडून दिलं होत, याबाबत त्यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं होत, काय आहे हा किस्सा हे जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Ashok Saraf On Fitness)
व्यायाम करणं ही प्रत्येक कलाकारांची जमेची बाजू आहे. मात्र याला अपवाद ठरत अशोक मामांनी थेट व्यायाम करणंच सोडून दिलं होत. व्यायामाबद्दल अशोक मामाचं नेमकं काय म्हणणं होत. झिरो फिगर, सिक्स पॅक यांसारख्या गोष्टींवर मामांची वैयक्तिक अशी मत होती. याबाबत बोलताना त्यांनी एका मुलाखतीदरम्यान भाष्य केलं आहे.
पाहा अशोक मामांनी का सोडलं होत व्यायाम करणं (Ashok Saraf On Fitness)
झिरो फिगर, सिक्स पॅकबद्दल बोलताना अशोक मामा म्हणाले की, “झिरो फिगर, सिक्स पॅक याची मला कधी गरजच पडली नाही. लहानपणी मी व्यायामशाळेत जात होतो. त्यावेळी एक वेडा विचार माझ्या डोक्यात आला, आणि तो वेडा विचार आहे, हे आता खरंतर जाणवतंय. मी स्टेजवर काम करताना एकदम इलेक्ट्रोफाईड ऍक्शन करतो, आणि व्यायाम करून समजा माझ्यातली लवचिकता निघून जाईल असं मला सारखं वाटायचं. म्हणून मी व्यायाम करायचं सोडून दिलं”.
“कुठल्याही परिस्थितीत मी व्यायाम करायचं टाळू लागलो. कारण मला सहजपणे हलता यावं. आणि माझ्या फिटनेसचं रहस्यही हेच वावरणं आहे. तुम्ही किती ऍक्टिव्ह राहता हेच फिट्सनेसचं रहस्य आहे. स्टेजवर काम करताना खूप वावरणं हे होतच. बरेचदा प्रेक्षक येऊन विचारतात की, ‘एवढी एनर्जी कुठून आणता तुम्ही’?

आजवर अशोक सराफ यांनी कित्येक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, आजही त्यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतं. मात्र आजवर काम करताना व्यायाम व्यायामशाळेत जाऊन केला नाही, म्हणून कोणत्याच अडचणींना मामांना सामोरं जावं लागलं नाही.