सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फुफ्फुसं ८०-८५ टक्के निकामी, गंभीर आजार, शस्त्रक्रिया अन्…; विद्याधर जोशींना झालेला गंभीर आजार खुलासा करत म्हणाले, “जगातून गेल्यानंतर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 18, 2023 | 4:08 pm
in Trending
Reading Time: 7 mins read
google-news
Vidyadhar Joshi was Suffered From Major Illness

Vidyadhar Joshi was Suffered From Major Illness

प्रत्येकाला आयुष्यात कठीण काळाला सामोरं जावं लागतं. असाच वेदनादायी काळ मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते सगळ्यांचे लाडके बाप्पा म्हणजे विद्याधर जोशी यांच्या आयुष्यात आला होता. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराच्या आयुष्यात मागील आठ-दहा महिने बरेच संघर्षमय गेले. सारं काही खूप छान सुरू असताना अचानक गंभीर आजार व्हावा आणि पुढे आयुष्याची सगळीच घडी विस्कटावी. असाच काहीसा प्रसंग या ज्येष्ठ अभिनेत्याबरोबर घडला.(Vidyadhar Joshi was Suffered From Major Illness)

‘मुंबई टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत विद्याधर जोशी यांनी हा त्रासदायक प्रवास सांगितला. करोनाच्या पहिल्या लाटेत विद्याधर यांना हा आजार झाला होता. त्यावेळी ‘ते माझा होशील ना’ या मालिकेत काम करत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचाराने ते बरेही झाले.

वाचा – आजारामुळे काय झालेली विद्याधर यांची परीस्थिती?(Vidyadhar Joshi was Suffered From Major Illness)

View this post on Instagram

A post shared by Vidyadhar Joshi (@bappajoshi27)

आणखी वाचा – Video : प्रसाद-सई ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर काय खातात?, व्हिडीओमध्ये दिसल्या दोन वाट्या, नेटकरी म्हणतात, “हे दोघं… ”

पण काही दिवसांनी त्यांना दुसऱ्यांदा करोना झाला. त्यावेळी मात्र आलेल्या तापचं कारण काहीतरी वेगळं असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी सिटीस्कॅन करून घेतला. तेव्हा समजलं की, फुफ्फुसांना जखम होऊन ‘फुफ्फुसांचा फायब्रॉसिस’ आजार झाला आहे. आणखी चाचण्या केल्यानंतर एक धक्कादायक बाब समोर आली की, त्यांचं फुप्फुसं १३ टक्के निकामी झालं आहे. या गंभीर प्रसंगातही ते सकारात्मकतेने परिस्थितीला सामोरे जात होते.

View this post on Instagram

A post shared by Vidyadhar Joshi (@bappajoshi27)

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या नारकर शिक्षणात अव्वल, स्वतःच सांगितलं किती झालं आहे शिक्षण?

दरम्यान त्यांना ‘आयएलडी-इन्टरस्टिशिअल लंग्ज डिसीज’ हा बरा न होणारा आजार झाल्याचं कळलं. त्या आजारावर औषधदेखील उपलब्ध नव्हती. फक्त तो आजार वाढू नये म्हणून त्यांना औषध दिली जात होती. पण त्या औषधांची काही खात्री नव्हती. अशा परिस्थितीतही ते काम करत होते. मालिका, सिनेमांचं चित्रीकरण करत होते. ‘जिवाची होतिया काहिली’ या मालिकेत काम करत असताना त्यांना पुन्हा त्रास सुरु झाला. त्यांचा आजार वेगाने वाढत होता. गेल्या डिसेंबर ते जानेवारी महिन्यात तर हा आजार एवढा वाढला की त्यांची दोन्ही फुफ्फुसं ८० ते ८५ टक्के निकामी झाली. यावर ‘फुफ्फुस प्रत्यारोपण’ हा एकमेव पर्याय शिल्लक होता पण तो बराच खर्चिक होता. पण हाच पर्याय त्यांनी निवडला आणि १२ जानेवारी २०२३ला मुंबईत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

View this post on Instagram

A post shared by Vidyadhar Joshi (@bappajoshi27)

आणखी वाचा – ८०व्या वर्षीही अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या का दिसत नाहीत? स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “त्यासाठी मी…”

शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना बोटंही हलवता येत नव्हती. ते म्हणाले, “पायाचं एक बोट हलवण्यासाठी किती ताकद लागते याची आपल्याला कल्पना नसते. शस्त्रक्रियेनंतर मी जवळपास पांगळा झालो होतो. साधं एक बोटसुद्धा मला हलवता येत नव्हतं. आपल्या शरीराची किंमत फार मोठी असते. ती मला प्रकर्षानं याच काळात कळली आणि शिस्तप्रिय असण्याचं महत्त्व मला समजलं”, असं त्यांनी सांगितलं. “आपल्याकडे इतर काही देण्यासारखं नसेल तर जगातून गेल्यानंतर आपण अवयव तरी दान करावेत. आज मी वाचलोय ते मला कोणीतरी फुप्फुसं दिली म्हणूनच!”. विद्याधर यांचा हा संपूर्ण प्रवास खूप कठीण होता. पण या सगळ्या प्रसंगांना ते हिंमतीने सामोरे गेले.

Tags: life experiencelife storymarathi actormarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
manasi naik talks about her divorce

“प्रसिद्धीपुरता त्याने...”, घटस्फोट व नवऱ्याबाबत मानसी नाईकचं मोठं भाष्य, रडत म्हणाली, “माज दाखवतात आणि...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.