मराठी चित्रपटविश्वातील अभिनेत्री मानसी नाईक आपल्या अदाकारीने नेहमीच प्रेक्षकांना घायाळ करते. मानसीने आजवर अनेक चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. पण तिला ओळख मिळाली, ती तिच्या नृत्यामुळे. मानसी सध्या कलाक्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून मानसी नाईक तिच्या खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत आलेली आहे. नुकतंच मानसीने पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला असून तिने याबाबतचा खुलासा केला आहे. (manasi naik talks about her divorce)
अभिनेत्री मानसी नाईकने भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मानसीने तिच्या संपूर्ण प्रवासाबाबत भाष्य करताना लग्न, घटस्फोट व खासगी आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहे. मानसी म्हणाली, “माझं नवऱ्यासोबतचा हा प्रवास खरंतर रीलपुरतंच होता. फक्त मीडिया, प्रसिद्धी या गोष्टींसाठी हे सगळं सुरु होतं. मला जे सांगण्यात आलं, ते काहीच खरं नव्हतं. पण ते पुढे कायदेशीररित्या पकडण्यात आली. मुळात मला त्या चौकात यायचाच नव्हतं. कारण मला नेहमीच एक सून म्हणून, बायको म्हणून मला माझं कुटुंब हवं होतं. ते स्वप्न माझं तात्पुरता अपुरं राहिलं असलं, तरी ते मी नक्कीच पूर्ण करेन. कारण प्रेमावरचा माझा विश्वास उडालेला नाही.”
हे देखील वाचा – “त्याचं डोकं फाटलं, माझ्या डोक्याला…”, एकदा नव्हे तर दोनवेळा मानसी नाईकला मृत्यूने गाठलं, म्हणाली, “मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर…”
पुढे लग्न आणि घटस्फोटाबद्दल बोलताना मानसी नाईक भावुक होत म्हणाली, “प्रत्येक मुलीच्या बकेट लिस्टमध्ये ही इच्छा असते की तिने लग्न करावं, तिचं कुटुंब असावं. मी लग्नानंतर बांगड्या, भांगेत कुंकू या सर्व गोष्टी प्रेमाने केल्या. पण काही असे लोक असतात, जे लग्नसंस्था, सप्तपदी, मेहंदी यांसारख्याचा अनादर करतात. त्याचा माजही दाखवतात. जा केलं तर काय, असंही म्हणतात. पण आता मी यातून बाहेर पडली आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.”
हे देखील वाचा – ‘दुनिया गेली तेल लावत…’, प्राजक्ता माळीच्या मराठी चित्रपटाची मोठी घोषणा, पोस्टरने वेधलं लक्ष
अभिनेत्री मानसी नाईकने मॉडेल प्रदीप खरेरासोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०२१ मध्ये लग्न केलं होतं. तेव्हा त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. ते दोघंही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. मात्र, काही काळानंतर दोघांनी त्यांचे रोमँटिक फोटो आपआपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलिट केले. त्यानंतर मानसीने आपल्या घटस्फोटाबद्दलची माहिती दिली होती. घटस्फोटानंतर मानसी तिच्या खासगी आयुष्यात व्यस्त व आनंदी आहे. (manasi naik talks about her divorce)