मराठी मनोरंजनसृष्टीत नव्वदीच्या दशकापासून आजपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांना भूरळ पाडणाऱ्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. हिंदी आणि मराठी मालिकेत विविध भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. ऐश्वर्या त्यांच्या नावाप्रमाणेच अतिशय सुंदर आहे. त्यांच्या सौंदर्याच्या चर्चा नेहमीच होत असतात. वय हा तर त्यांच्यासमोर उभा असलेला प्रश्नच आहे. पन्नाशी उलटली असली तरीही त्यांच्या सौंदर्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्या फिटनेसचा वेगळा असा चाहतावर्ग आहे. त्या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अशातच नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी संवाद साधला. त्यावर एका चाहत्याने त्यांच्या शिक्षणाबाबत प्रश्न विचारला. यावर त्यांनी आपल्या शिक्षणाबाबत खुलासा केला आहे. (Aishwarya Narkar on Her Education)
इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ हा ट्रेन्डमध्ये असलेला सेशन आहे. या सेशनवरून बरेच कलाकार मंडळी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतात. ऐश्वर्या यांनीही या सेशनवरून चाहत्यांशी संवाद साधला. अनेक चाहत्यांनी त्यांना विविध विषयांवर प्रश्न विचारले. बऱ्याच चाहत्यांनी त्यांच्या फिटनेस आणि लांबसडक केसांचं कौतुक देखील केलं. काहींनी त्यांच्या सौदर्यांच्या रहस्याबाबतही प्रश्न केले. त्यासर्व प्रश्नांची त्यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली.
वाचा – ऐश्वर्या यांनी कोणत्या क्षेत्रात घेतली आहे पदवी? (Aishwarya Narkar on Her Education)

आणखी वाचा – फुलांची सजावट, विविध पदार्थ अन्…; मुग्धा वैशंपायनचं आजोळी थाटामाटात केळवण, म्हणाली…
दरम्यान एका चाहत्याने त्यांना शिक्षणाबाबत प्रश्न केला. त्याला उत्तर देताना ऐश्वर्या यांनी त्यांच्या शिक्षणाचा उलगडा केला. ऐश्वर्या यांनी मायक्रोबायोलॉजी अॅनीमल कम्युनीकेटर रेकी याक्षेत्रात बीएससी केलं आहे. त्यांच्या या शिक्षणावरून त्या विशेष प्राणीप्रेमी असल्याचा उलगडा होतो.
ऐश्वर्या यांनी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यांनी त्यांच्या फिटनेसबाबत तसेच त्यांच्या सौंदर्याच्या रहस्याबाबतही सांगितलं आहे. दरम्यान त्यांनी चाहत्यांना टिप्स देखील दिल्या आहेत. ‘ताली’ वेबसीरिजमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं ही चाहत्यांकडून विशेष कौतुक करण्यात आलं.