बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘OMG २’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची बरीच चर्चा रंगली होती. शिवाय चित्रपटावरून अनेक वादही निर्माण झाले होते. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक व समीक्षकांनी कौतुक केले आहे. आता अक्षयच्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे. (OMG 2 Box Office Collection)
अभिनेता अक्षय कुमार बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर ‘ओह माय गॉड’चा दुसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात अक्षयसह पंकज त्रिपाठी, यामी गौतम आदी प्रमुख भूमिकेत आहे. लैंगिक शिक्षणावर आधारित असलेल्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने जरी ‘A’ सर्टिफिकेट दिलं असलं, तरी चित्रपटाचा विषय आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे. शिवाय अनेक चित्रपट समीक्षकांनी ‘OMG २’ चे भरभरून कौतुक करत आहे.
हे देखील वाचा – कार्तिक आर्यन २०२३च्या अखेरीस विवाहबंधनात अडकणार? करण जोहरच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
प्रचंड कौतुक होत असतानाही चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले असून चित्रपटाने अपेक्षेपेक्षा कमी कमाई केली आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.२६ कोटींची कमाई केली आहे. त्याचवेळी, ‘गदर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ४० कोटींची कमाई केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र, वीकेंड व स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पाहता प्रेक्षक ‘OMG २’ चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता असल्याचा व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा – ‘गदर २’ च्या प्रीमिअरला नाना पाटेकरांची हवा, व्हिडिओ होतोय व्हायरल..
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘OMG २’ चित्रपटाचे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. याआधीच्या भागात अक्षयसह अभिनेते परेश रावल व मिथुन चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाले. (OMG 2 Box Office Collection)