बॉलीवूडचे दोन मोठे चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाले. त्यातील एका चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो म्हणजे अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट ‘OMG २’. अक्षयसह पंकज त्रिपाठी, यामी गौतम हेदेखील मुख्य भूमिकेत असून चित्रपटाबद्दल लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. (OMG 2 First Review)
‘OMG २’ हा चित्रपट लैंगिक शिक्षणावर आधारित असून याचं कथानक शिवभक्त कांती शरण मुदगलभोवती फिरणारे आहे. मात्र जेव्हा कांती अडचणीत येतो, तेव्हा त्याच्या मदतीला भगवान शिव येतात आणि सिनेमाचे कथानक सरकते. हा चित्रपट अनेक कारणांनी चर्चेत आला होता. शिवाय, चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील झाली होती. पण आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून अनेक प्रतिक्रिया येत असून चित्रपट मनोरंजन करण्याबरोबरच महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा असल्याचे ट्विटरद्वारे म्हणत आहे.
हे देखील वाचा – Gadar 2 First Review : कसा आहे सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट, पहिला शो बघितल्यानंतर प्रेक्षक म्हणाले…
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी ट्विटरवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात प्रेक्षकांना चित्रपटाची कथा आवडली असून अक्षयसह अन्य कलाकारांचा अभिनय आवडल्याचेही यात म्हटलं आहे. शिवाय, या चित्रपटातून लैंगिक शिक्षणसारख्या विषयावर उत्तम संदेश दिला असल्याचे प्रेक्षक म्हणत आहे. लेखन आणि दिग्दर्शनाचे कौतुक करताना चित्रपटाला जरी ‘A’ सर्टिफिकेट मिळालं असला, तरी प्रत्येकाने हा चित्रपट जरूर पाण्याचे आवाहन चाहते ट्विटरवर करत आहेत. (OMG 2 Twitter Review)
हे देखील वाचा – सुपरस्टार रजनीकांतच्या ‘जेलर’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, एका दिवसातच कमावले तब्बल ‘इतके’ कोटी
#OMG2Review 🌟🌟🌟🌟🌟
— Asutosh Dash (@asutoshdash07) August 11, 2023
Words can't define the excellence the whole team has done. #Akshaykumar sir's best Movie ever Period….@raiamitbabulal Charan sparsh 🙏 @TripathiiPankaj u nailed it 💥 @yamigautam ma'am aur yeh apke liye ♥️♥️
Overall movie is a "BONAFIED BLOCKBUSTER"… pic.twitter.com/JUDuekkiT1
अक्षयचा ‘OMG २’ हा २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यात परेश रावल आणि मिथुन चक्रवर्ती यांची प्रमुख भूमिका होती.