बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ चित्रपटांपेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. अनेक वर्षांपासून त्याचं नाव अभिनेत्री दिशा पटानीशी जोडलं गेलं होत. पण दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याची अधिकृत कबुली दिली नाही. त्यांच्या नात्याबद्दल नेहमी सोशल मीडियावर चर्चा या होत होत्या. अशातच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनाही उधाण आलं होत. ब्रेकअपनंतरही दोघांनी त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं होतं. (Tiger Shroff’s New Girlfriend)
आता टायगरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाने एन्ट्री मारली असल्याचं बोललं जात आहे. टायगरच्या आयुष्यात पुन्हा एकदा ‘दिशा’ आली असून ही ‘दिशा’ वेगळी आहे. या विषयावर खुद्द अभिनेता टायगर श्रॉफने ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो दिशा धनुकाला डेट करत असल्याचं बोललं जात होतं.
वाचा – टायगर श्रॉफ कोणाला करतोय डेट? (Tiger Shroff’s New Girlfriend)
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, दिशा धनुका आणि टायगर श्रॉफ गेल्या वर्षी जुलैपासून एकमेकांसोबत आहेत. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार टायगर आणि दिशाने आपलं नातं संपुष्टात आणल्याचं वृत्त होतं. मागील वर्षभरात टायगर आणि दिशा पटानीच्या ब्रेकअपच्या बातम्या खुप प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यातच टायगरच्या आयुष्यात दिशा धनुकाची एन्ट्री झाली असावी. गेल्या वर्षी करण जोहरच्या ‘चॅट शो’मध्ये याविषयाबाबत नकार देत त्याने सिंगल असल्याचा दावा केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, टायगर दीड वर्षांहून अधिक काळ दिशा धनुकाला डेट करत आहे. दिशा एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. दिशा अनेकदा टायगरला स्क्रिप्टबद्दल मार्गदर्शन करत असते. तसंच ती टायगरच्या फिटनेसची ही काळजी घेते. टायगरच्या कुटुबियांची दिशाला पसंती असल्याचंही सूत्रांच्या माहितीनुसार समोर आलं आहे.
दरम्यान या प्रकरणाबाबत टायगर सोबत संवाद साधला असता त्याने मेसेज करून खुलासा केला आहे की, ”मी गेली दोन वर्ष सिंगल आहे”. तर दुसरीकडे दिशाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.