मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे त्याच्या विशिष्ट शैलीसाठी ओळखले जातात. असाच एक कलाकार जो अभिनयासह दिग्दर्शनासाठी मुख्यत्वे ओळखले जातात, ते म्हणजे प्रवीण तरडे. २०१८ साली प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट दिग्दर्शित केला होता. शेतकरी आणि वास्तविक घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला, आणि सुपरहिट ठरला होता. चित्रपटातील सर्वच पात्रे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. यातील गाणी व डायलॉग्स आजही लोकांच्या ओठांवर आहेच, शिवाय चित्रपटावर आधारित अनेक मीम्सनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. (Mulshi Pattern)
या सुपरहिट चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून बॉलीवूड अभिनेता सलमान खानने हाच चित्रपट ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ नावाने हिंदीत बनवला होता. मात्र, त्याला प्रेक्षकांचा पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही. बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाने त्याकाळात अनेक रेकॉर्ड तोडले होते, मात्र १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठता आला नव्हता. आता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी यावर खंत बोलून दाखवली आहे. (Pravin Tarde on Mulshi Pattern)
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अभिनेता उपेंद्र लिमयेसह ‘बोल भिडू’च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळेस त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाविषयी बोलताना १०० कोटी रुपयांचा आकडा पार न केल्याबद्दल एक खंत बोलून दाखवली. प्रवीण तरडे यामध्ये म्हणाले, “चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर बरेच शो हाऊसफुल्ल झाले. त्यादरम्यान सकाळी साडेसहा वाजल्यापासून पुण्यात मुळशी पॅटर्नचे शोज लागत होते. फक्त त्यावेळी प्रसारमाध्यमांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं. सगळ्यांनीच नाही, पण खूप लोकांनी सहकार्य केलं होतं. कपिल, सागर आव्हाड यांनी त्याकाळात खूप मदत केली. अमोल व अजय परचुरे या दोघा भावांनीसुद्धा मदत केली.”
हे देखील वाचा – प्रविण तरडेंची मोठी घोषणा, एसएस राजामौलींच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार, म्हणाले, “त्यांनी मला पाहिलं अन्…”
“पण काही पत्रकारांनी खोडसाळ बातम्या देत गुन्हेगारीचा चित्रपट असल्याचं दाखवलं. मात्र सगळ्यांनी चित्रपट पहिला. आता त्याला पुरस्कार मिळाला, डोक्यावर घेऊन नाचले. शेतकऱ्यांचा एवढा मोठा चित्रपट. जर मुळशी पॅटर्नला ‘A’ सर्टिफिकेट दिलं नसतं आणि खोडसाळ पत्रकारांनी काही कारण नसताना गुन्हेगारीचा चित्रपट म्हणून रंगवलं नसतं, तर हा चित्रपट १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला असता. कारण, तळागाळातल्या समाजाचा मातीचा प्रश्न सांगणारा चित्रपट हा सुपरहिटच होतो आणि तो झालाच शेवटी.”

हे देखील वाचा – काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा…; प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? कुटुंबासह केली धमाल-मस्ती
“चित्रपटाने खूप पैसे कमवले, पण १०० कोटींच्या क्लबमध्ये त्याची जायची ताकद होती. पुढे सगळ्या चित्रपटांनी खूप मजा केली, पण मुळशी पॅटर्न हा इथल्या मातीतला चित्रपट असल्याने मला याची खंत वाटते.” असे दिग्दर्शक प्रवीण तरडे मुलाखतीत म्हणाले. (Pravin Tarde on Mulshi Pattern)