सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी फक्त तुमचाच आहे”, अक्षय केळकरने सुरेखा पुणेकर यांच्याबरोबर शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “त्यांना नाचताना पाहिलं अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 7, 2023 | 5:43 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Akshay kelkar on Surekha Punekar

Akshay kelkar on Surekha Punekar

‘बिग बॉस मराठी सिझन ४’चा विजेता ठरलेला अक्षय केळकर सध्या ‘ढोलकीच्या तालावर’ या लोकप्रिय रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दोन कटिंग या शॉर्ट फिल्मने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या शॉर्ट फिल्म मधील समृद्धी केळकर आणि अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलं. सध्या अक्षय ढोलकीच्या तालावर या रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालन करण्यात रमला आहे. अशातच अक्षयच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने साऱ्यांच्या नजरा वाळवून घेतल्या आहेत. (Akshay kelkar on Surekha Punekar)

‘ढोलकीच्या तालावर’ या मंचावर घुंगराच्या तालावर सगळ्यांना नाचविणाऱ्या आणि आपल्या मोहक सौंदर्याने भुरळ घालणाऱ्या नृत्यांगना सुरेखा पुणेकर यांनी हजेरी लावली होती. सुरेखा पुणेकर यांच्या लावणीचे लाखो चाहते आहेत. अशातच ‘बिग बॉस’ फेम अक्षय केळकरने सुरेखा ताईंच्या लावणीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

पाहा अक्षय काय म्हणाला सुरेखा पुणेकर यांच्याबद्दल (Akshay kelkar on Surekha Punekar)

या पोस्टमध्ये अक्षयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय सुरेखा ताईंचं भरभरून कौतुक करताना दिसतोय. तसेच यावेळी त्याने ‘मी फक्त तुमचाच आहे’, असेही म्हटलं आहे. अक्षयने पोस्ट शेअर करत लिहिलंय, “आयुष्यात कधीच live लावणीचा कार्यक्रम पाहिला नव्हता. ‘ढोलकीच्या तालावर’च्या निमित्ताने आमच्या सर्व contestants ना एकमेकांशी चढाओढ करताना पाहतो, पण ते नाचत असताना त्यांनाही आपण स्पर्धेत आहोत याची जाणीव असतेच.”

View this post on Instagram

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

हे देखील वाचा – काय झाडी, काय डोंगर, काय धबधबा…; प्राजक्ता माळीचं आलिशान फार्महाऊस पाहिलंत का? कुटुंबासह केली धमाल-मस्ती

“काल पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने एका लवण्यावतीला बेभान होऊन नाचताना पाहिलं. या लावण्यावतीला दाद देण्यासाठी समोर प्रेक्षक म्हणून जवळ जवळ ३००० महिला होत्या. त्या कलेचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला आणि त्या क्षणाचा मी साक्षीदार होऊ शकलो याचा मला खूप अभिमान आहे. आज पर्यंत तुमच्या विषयी खूप ऐकून होतो पण सुरेखा यांना live नाचताना विंगेतून पाहिलं आणि खरंच माझ्यासाठी पर्वणी होती.”

हे देखील वाचा – “गुन्हेगार टॉयलेट करताना त्यांच्यासमोर उभा राहतो कारण…” समीर वानखेडेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “चार ते पाच दिवस…”

अक्षय केळकरने सोशल मीडियावर केलेली ही पोस्ट विशेष चर्चेत आहे. सुरेखा ताईंनीही अक्षयला प्रेम दिलेलं पाहायला मिळतंय.

Tags: akshay kelkardholkichya talavarsurekha punekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Actor Vikas Patil Shares Glimps Of His House And Farm

कोल्हापुरमध्ये आलिशान घर, शेती अन्...; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने दाखवलं गाव, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “जगात भारी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.