सोमवार, जून 2, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्ही कर्ज काढून जगतोय”, भारती सिंह व तिच्या नवऱ्याचा वाईट काळ, स्वतःच केला खुलासा, कमी पैसे मिळतात अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 30, 2025 | 6:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bharti singh Harsh limbachiya

“आम्ही कर्ज काढून जगतोय”, भारती सिंह व तिच्या नवऱ्याचा वाईट काळ

कलाक्षेत्रात काम करत असताना आर्थिक स्थिरता हा मुद्दा कायमच वर डोकावू पाहतो. कलाकारांकडूनही याबाबत अनेकदा भाष्य केलं जातं. इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना कधी हाती कामच नसतं. काम असलं तर स्वतःला वेळही देता येत नाही अशी परिस्थिती असते. पण कलाकारांच्या हाती काम नसेल तर पडत्या काळाला तितक्याच हिंमतीने मात द्यावी लागते. बऱ्याचदा कलाकारांच्या मानधनाविषयी विविध चर्चा रंगताना दिसतात. काही कलाकारांचं दिवसाचं मानधन लाखांमध्ये असतं असं बोललं जातं. मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच चित्र असल्याचं काही कलाकारांचं म्हणणं आहे. भारती सिंह व तिचा पती हर्ष लिंबाचियाने त्यांच्या पॉडकास्टमध्ये याविषयी भाष्य केलं. (Bharti singh Harsh limbachiya)

हर्ष व भारतीच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री रिम शेखने हजेरी लावली होती. यावेळी सध्याची टेलिव्हीजन विश्वातील परिस्थिती याबाबत अनेक चर्चा रंगल्या. यावेळी टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये ‘लाफ्टर शेफ’ सारखे मोठ शो खूप कमी प्रमाणत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत असं हर्षचं म्हणणं आहे. त्याचबरोबरीने आधीच्या तुलनेपेक्षा आता टेलिव्हीजनमध्ये खूप कमी पैसे मिळतात असंही हर्षने सांगितलं.

आणखी वाचा – अर्शद वारसी व त्याच्या पत्नीवर मोठी कारवाई, शेअर बाजारात घोटाळा केल्याप्रकरणी SEBIचा महत्त्वपूर्ण निर्णय, नक्की प्रकरण काय?

View this post on Instagram

A post shared by Bharti Siingh (@bharti.laughterqueen)

हर्ष व भारती स्वतः लोन काढून काम करत असल्याचा खुलासा त्यांनी केला. हर्ष म्हणाला, “आम्हीही काही गंभीर समस्यांचा सामना करत आहोत. मी एका चॅनलवर शो होस्ट करत असतो. तर भारती दुसऱ्या एका चॅनलच्या सुत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळते. त्यामुळे लोकांना असं वाटतं की, आम्ही खूप पैसे कमावते. भारती दिवसाला ५० लाख तर मी दिवसाला २० लाख रुपये कमावत असल्याचा लोकांचा समज आहे”.

आणखी वाचा – जबरदस्ती किस, त्याने बघताच पँटमध्ये हात घालत…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर किळसवाणा प्रकार, धावत सुटली अन्…

पुढे हर्ष म्हणाला, “आमची कमाई मोठी आहे असं सांगितलं जातं. पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही. आम्ही कर्ज काढून जीवन जगत आहोत. आमच्याजवळ आलेलं काम जर आम्ही केलं नाही तर ते कोणीतरी दुसरं करणार एवढं नक्की”. यावर भारती मजेत म्हणाली की, “सकाळी दूधवाला जरी आला तरी आम्हाला असं वाटतं की, कोणीतरी कर्ज वसूल करणारा दारात आला आहे”. सध्या भारती ‘लाफ्टर शेफ २’चं सुत्रसंचालन करत आहे.

Tags: Bharti Singhbollywood newsentertainment newsharsh limbachiya
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Gauahar Khan on suniel Shetty
Women

“सी-सेक्शन म्हणजे आराम”, सुनिल शेट्टींच्या वक्तव्यावर भडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, म्हणाली, “अनुभवलं नाही मग बोलले कसे?”

जून 2, 2025 | 2:51 pm
 Heeramandi Actress Sharmin Segal
Entertainment

‘हिरामंडी’ फेम अभिनेत्री झाली आई, गोंडस मुलाला दिला जन्म, कुटुंबात जंगी सेलिब्रेशन

जून 2, 2025 | 2:07 pm
Next Post
Yuvika Chaudhary Pregnancy

युविका चौधरीसाठी गरोदर राहणं होतं इतकं कठीण, शेवटी IVF चा अवलंब करावा लागला कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.