Shivani Rangole Emotional Post : ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करतात. या मालिकांमध्ये सध्या सुरु असलेली ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या मालिकेने अल्पावधीतच रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मालिकेतील अक्षरा व अधिपतीच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरले. या भूमिका शिवानी रांगोळे आणि हृषीकेश शेलार यांनी साकारल्या आहेत. तर मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत भुवनेश्वरी हे पात्र अभिनेत्री कविता लाड यांनी साकारलं आहे. सध्या मालिकेची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे कारण ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. याबाबत आता प्रेक्षकांमध्येही चर्चेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने मालिकेतील कलाकारही भावुक झाले आहेत. अशातच प्रेक्षकांची लाडकी अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळेने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. “All happy families are alike…” is a part of my all time favorite quote by Leo Tolstoy! आज तुला शिकवीन चांगलाच धडा या आपल्या मालिकेचा शेवटचा भाग. दोन वर्ष हसत, रडत, समजून घेत कुटुंबासारखे राहिलो. आणि आज त्याच कुटुंबाला रेल्वे स्थानकावर निरोप देऊन सगळे आपापल्या वाटेला गेल्याची भावना आहे. पण समाधान चांगल्या माणसांनी एकत्र येऊन, चांगल्या हेतूने चांगलं काम केलं आणि इथून पुढेही वेगळ्या प्रोजेक्टच्या रुपात एकत्र येऊन करत राहू याचं आहे!”.
आणखी वाचा – आमिर खानच्या लेकीला ओळखणंही झालं कठीण, लग्नानंतर वजन इतके वाढले की…; व्हिडीओ पाहून प्रेक्षकही अवाक्
पुढे तिने असंही म्हटलं आहे की, “प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद, दिलेल्या प्रेमाबद्दल, शिकवणी बद्दल आणि सांभाळून घेतल्याबद्दल! झी मराठी वाहिनीचे खूप आभार कारण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. आणि माध्यमांना खूप प्रेम ज्यांनी आम्हाला नेहमीच उत्साहित केलं. भेटूया पुन्हा”. शिवानीने हृषीकेश आणि कविता लाड यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत ही पोस्ट शेअर केली आहे.
कविता मेढेकर-लाड यांनी महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मालिका लवकरच निरोप घेण्याबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “मालिका संपल्यावर दोन-सव्वादोन वर्षांनी मिळणाऱ्या निवांत वेळेचा सदुपयोग करण्याकडे त्या अधिक लक्ष देणार आहेत. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचे ७५०हून अधिक प्रयोग झाले आणि हे प्रयोग यापुढेही सुरु राहणार आहेत. अजून एखादं नाटक करायला त्यांना विशेष आवडेल. माध्यमांपेक्षा कंटेंट त्यांना अधिक महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे आव्हानात्मक भूमिकेसाठी विचारणा झाली, तर कोणत्याही माध्यमात काम करायला त्यांना आवडेल”, असं त्यांनी म्हटलं.