टेलिव्हीजन हे मनोरंजनाचं प्रभावी माध्यम आहे. मालिकांचा प्रेक्षकवर्ग तर कमालीचा आहे. मराठी मालिका पाहणारे प्रेक्षक तर कलाकारांवर अगदी जीवापाड प्रेम करतात. एखादी मालिका सुरु झाली की, प्रत्येक एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. मराठी टेलिव्हीजन विश्वात तर बऱ्याच मालिका टीआरपीच्या शर्यतीत पुढे आहेत. त्यातीलच एक मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करुन राहिली. मालिकेची कथा प्रत्येक वळणावर रंजक होत गेली. आता ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. (navri mile hitlerla serial off air)
२०२४मध्ये ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. मालिकेतील एजे व लीला यांच्या लव्हस्टोरीला अधिकाधिक पसंती मिळाली. एजे व लीला यांच्या केमिस्ट्रीभोवती फिरणारी इतर नातीही तितकीच रंजक ठरली. एजे म्हणजेच राकेश बापट तसेच लीला म्हणजेच वल्लरी विराजने प्रेक्षकांना आपलसं केलं. राकेश व वल्लरी ही फ्रेश जोडी छोट्या पडद्यावर पाहायला मिळाली. दोघांच्याही वाट्याला आलेल्या भूमिका त्यांनी उत्तमरित्या साकारल्या. आता ही मालिका संपणार आहे.

वर्षभरातच ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी कलाकारही अगदी भावूक झाले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कलाकारांनी याबाबत माहिती दिली. वल्लरी सेटवरचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुला कसं वाटत आहे? असं लोक विचारतात. तेव्हा स्वतःलाच कळतं की, नक्की मनात काय सुरु आहे. पण ते शब्दांत व्यक्त करु शकत नाही”. तर अभिनेता प्रसाद लिमयेनेही भावुक पोस्ट शेअर केली. तो म्हणाला, “एक सुंदर प्रवास संपला. रसिक प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद”.
आणखी वाचा – “डोक्याला कीड लागली, पागल झाले, वाईट अनुभव अन्…”, ‘बिग बॉस मराठी’बाबत बोलल्या उषा नाडकर्णी, ७७ दिवसांनंतर…
अभिनेता मिलिंद नंदाने जहागिरदारांच्या बंगल्याचा फोटो शेअर केला. यावेळी तो म्हणाला, “जहागिरदारांचा बंगला नेहमी माणसांनी हसत खेळत चांगला. माहित नाही इथली माणसं उद्या पासून कुठे असतील. पण जिथे कुठे असतील फक्त प्रेम देत असतील”. या मालिकेत वल्लरी व राकेशसह शर्मिला शिंदे, माधुरी भारती, प्रसाद लिमये, सानिका काशीकर, भारती पाटील आदी कलाकारांनी उत्तम काम केलं.