पहलगाम हल्ला संपूर्ण देशाला हादरवणारा होता. दहशतवाद्यांना धर्म नसतो असं म्हणतात. पण त्यांनी मात्र पर्यटकांना धर्म विचारुनच गोळीबार केला. ना त्यांनी जात विचारली ना भाषा. पहलगाम हल्ला प्रकरण पेटलं असताना आता सरकारद्वारेही विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना १ मे पर्यंत परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर भारतात असलेल्या पाकिस्तानी मंडळींना त्यांच्या देशात लवकरात लवकर जाण्यास सरकारकडून सांगण्यात आलं आहे. हे संपूर्ण प्रकरण ताजं असताना कलाकार मंडळीही याबाबत आपलं मत मांडत आहे. दरम्यान शाहरुख खाननेही पहलगाम हल्ल्याबाबत पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं होतं. आता त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. (pahalgam attack shahrukh khan old video viral)
दशतवादी फॉलो करत असलेला धर्म…
शाहरुख त्याच्या धर्माचं योग्य पद्धतीने पालन करतो. पण हे सगळं करत असताना तो इतर धर्माचाही आदर करतो. याचबाबत त्याने एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. शाहरुख म्हणालेला, “मी खोटं बोलणार नाही. दहशतवाद हा इस्लाम धर्मामधूनच होतो, हे आधी मला कोण बोलायचं तेव्हा मी ही गोष्ट नकारायचो. पण आता मला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आहेत. ते दहशतवादी इस्लाम धर्म फॉलो करतात तो आमचा इस्लाम धर्म नाही”.
इस्लाम धर्मात शिकवतात की…
पुढे तो म्हणालेला, “कुराणमध्ये नमुद केलेल्या गोष्टी पवित्र आहेत. कुराणलाच इस्लाम धर्म म्हणून बघत असू तर या साऱ्या गोष्टी यामध्ये लिहिल्या गेल्या नाहीत. एखाद्या व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत करत असेल तर तो संपूर्ण मानव जातीलाच मदत करतो. आणि कोणाला दुःख देत असेल तर सगळ्यांनाच दुःख देतो असं कुराणमध्ये सांगण्यात आलं आहे”.
When India’s icon #ShahRukhKhan talked about Islam, Quran and Terrorism in an interview with @sardesairajdeep. Must watch and do share for others.
— Aavishkar (@aavishhkar) May 8, 2023
pic.twitter.com/2KJ6inpfew
“इस्लाम धर्मासाठी जर तुम्ही लढा देत असाल तर महिला, मुलं, जनावरं आणि शेतीचं कोणतंच नुकसान करु नका असं अल्लाहनेच सांगितलं आहे. पण हे लोक जे इस्लाम धर्म फॉलो करतात ते मुल्लाचं बोलणं आहे. मला कोणाच्याही विरोधात जायचं नाही. पण हे सत्य सांगताना मला दुःख होत आहे”. शाहरुखने मोजक्याच शब्दांत दहशतवाद्यांच्या विचारांबाबत सांगितलं होतं. तसेच ते फॉलो करत असलेला धर्म इस्लाम नसून वाईट कृत्य करतात हे त्याचं स्पष्ट मत आहे.