रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ती हिंदू, भारताची सून, तिच्यावर अन्याय…”, राखी सावंतचा सीमा हैदरला पाठिंबा, पहलगाम हल्ल्यावरुन बरळली

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 26, 2025 | 2:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
rakhi sawant seema haider

राखी सावंतचा सीमा हैदरला पाठिंबा, अभिनेत्रीच्या वक्तव्यामुळे खळबळ

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. सर्वच स्थरातून या दहशतवादी हल्ल्याविरोधात निदर्शनंही केली जात आहेत. दरम्यान सरकारकडूनही याच पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. भारतात असणाऱ्या पाकिस्तानी लोकांना लवकरात लवकर देश सोडण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. तर पाकिस्तानात असलेल्या भारतीयांना पुन्हा देशात यायचं असेल त्यांनीही लवकरात लवकर यावे असं सरकारद्वारे बजावण्यात आलं आहे. सरकारच्या या नियमांनंतर पाकिस्तान-भारत बॉर्डरवर, विमानतळावर गर्दी पाहायला मिळाली. काही पाकिस्तानी मंडळींनी संताप व्यक्त केला. अशातच आता राखी सावंतने जुना वाद उकरुन काढला आहे. (rakhi sawant on seema haider)

पाकिस्तानमधून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत राखीने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सीमाला भारतातच राहू द्या असं राखीचं म्हणणं आहे. सीमा भारताची सून आहे असं राखीचं म्हणणं आहे. राखी म्हणाली, “मित्रांनो, सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये पाठवू नये. कारण ती भारताची सून आहे. तसेच मित्राची बायको आहे. भारताने तिला पाकिस्तानमध्ये पाठवू नये. ती सचिनवर खूप प्रेम करते. आता ती भारतीयच झाली आहे”.

आणखी वाचा – Video : लेकाच्या अस्थि विर्सजन करताना वडिलांनी फोडला हंबरडा, रडत खालीच कोसळले तेव्हा…; हृदय पिळवटून टाकणारी घटना

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

पुढे ती म्हणाली, “असा अन्याय कोणत्याही स्त्रीवर होऊ नये. ती जर आई झाली नसती तर तुम्ही तिला पाठवू शकत होतात. सीमा हैदरबरोबर तुम्ही काहीच चुकीचं करु शकत नाही. स्त्रियांचा आदर करा. हे कटकारस्थान कोणी रचलं आहे हे माहित नाही. देवालाच सगळं माहिती आहे. पण ज्यांचा काहीच दोष नाही त्यांच्यावर अन्याय करु नका. मुस्लिमनंतर ती आता पूर्णपणे हिंदू झाली आहे”.

आणखी वाचा – सतत नशेत, लेकीला त्रास अन्…; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने २२ वर्षांनी घटस्फोट घेताच नवऱ्याचं निधन, सांगितलं सत्य

सीमा भारताचाच जयजयकार करते असंही राखीचं म्हणणं आहे. २०२३मध्ये सीमा चुकीच्या मार्गाने पाकिस्तानातून भारतात आली होती. तिने ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय सचिन मीनाशी लग्न केलं. त्यानंतर सीमा हैदर हे प्रकरण बरंच गाजलं. सरकारलाही याची दखल घ्यावी लागली. मात्र आता ती देश सोडणार का? हा प्रश्न आहे. तिच्या पाठिशी राखी उभं असल्याचं तिच्या व्हिडीओमधून दिसून आलं आहे.

Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Mahesh manjrekar on Vicky kaushal chhava movie

“’छावा’ माझ्यामुळे चालला असं विकीने बोलूच नये आणि...”, महेश मांजरेकरांचं बेधडक वक्तव्य, हिंदी चित्रपटांची परिस्थिती...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.