रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आईकडून वाचवण्याचा प्रयत्न, बाबाच्या पोटात गोळी, वाहतं रक्त अन्…; लेकीने सांगितली वडिलांच्या मृत्यूची हृदयद्रावक कहाणी

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 24, 2025 | 6:23 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
Pahalgam terror attack updates

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची भयावह कहाणी, लेक व बायकोला वाली कोण?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांनी आपला जीव गमावला. काही कुटुंबातील तर कर्ते पुरुषच आपल्या जवळच्या मंडळींना कायमचे सोडून गेले. ही भयावह घटना आयुष्यभर कुटुंबियांच्या मनात घर करुन राहणार आहे. हल्ल्यादरम्यान पहलगाममध्ये संपूर्ण घटना पर्यटकांनी डोळ्यांदेखत पाहिली. तेव्हा तेथील परिस्थिती अत्यंत भयावह होती. यामध्ये डोंबिवलीचे संजय लेले, हेमंत जोशी व अतुल मोने यांनी आपला जीव गमावला. दरम्यान अतुल मोने यांची पत्नी व मुलगी ऋचा मोने यांनी पहलगाममधील सत्य परिस्थिती काय होती? याविषयी सांगितलं. डोळ्यांसमोर एका मुलीने तिच्या वडिलांना तर पत्नीने तिच्या पतीला गमावलं. (Maharashtra tourist killed in pahalgam terror attack)

अतुल मोने मध्य रेल्वेमध्ये अभियांत्रिक पदावर कार्यरत होते. आता सरकारद्वारे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अतुल यांच्या पत्नीला मध्य रेल्वेमध्ये नोकरी देण्यात येणार आहे. दरम्यान एबीपी माझा या वृत्त वाहिनीशी संवाद साधताना ऋचाने संपूर्ण हल्ल्याबाबत सांगितलं. तसेच वडिलांना आणि दोन्ही काकांना तिने रक्ताच्या थारोळ्यात पाहिलं. दोन दहशतवाद्यांना तिने गोळीबार करताना पाहिलं. हा काळा दिवस कधीही न विसरणारा आहे.

हिंदू कोण मुस्लिम कोण? विचारताच…

ऋचा म्हणाली, “आम्ही मिनी स्वित्झर्लँडमध्ये होते. तिथे सगळं सुरळीत सुरु होतं. तिथे लोक एन्जॉय करत होते. फोटो वगैरे काढत होते. आम्ही तिथून निघणारच होतो आणि गोळीबार सुरु झाला. काय सुरु आहे हे कळायलाच मार्ग नव्हता. सगळे एकाच दिशेने पळत होते. खाली झुकत होते. मीही तसंच केलं. फायरिंग सुरुच होती. मी तरी दोन जणांना फायरिंग करताना पाहिलं. आम्ही एका ठिकाणी एकत्र होते. तिथे ते लोक आले. त्यांनी विचारलं की, हिंदू कोण आहे?, मुस्लिम कोण आहे?. तिथे माझ्या संजय काकांनी (संजय लेले) थोडा हात वरती केला. तर त्यांना डोक्यात समोरच गोळी मारली. त्यांच्या मागेच मी उभी होती. हे सगळं मी पाहिलं”.

आणखी वाचा – “बाबांच्या डोक्यावर माझा हात, रक्ताच्या थारोळ्यात ते होते अन्…”, लेकाने डोळ्यांसमोर पाहिला वडिलांचा मृत्यू, सांगितली घटना

…अन् बाबाच्या पोटात गोळी मारली

“तेव्हा हेमंत काका (हेमंत जोशी) त्यांना विचारायला गेला की, नक्की काय झालं आहे?. तर त्यांच्यावरही गोळी झाडली. तेव्हा बाबा बोलले की, गोळी नका मारु आम्ही काही करत नाही आहोत. तिथे माझी आई होती. मीही घाबरली होती. त्यामुळे बाबाबरोबर उभी होते. आई पुढे बाबाला कव्हर करायला गेली. पण त्यांनी बाबाच्या पोटात गोळी मारली. मी ते पाहून खाली झोपले. भाऊ व काकू जवळ गेले. पण आई तिथेच होती. मी जिथे गेले तिथे संजय काकांचं डोकं रक्ताने भरलं होतं. माझ्या डोळ्यासमोर मी रक्त वाहताना बघत होते”.

आणखी वाचा – “तेव्हा हिंदूंना रांगेत उभं करत गोळ्या मारल्या”, पहलगाम हल्ल्याबाबत विवेक अग्नीहोत्रींचं वक्तव्य, म्हणाले, “काश्मीर फाइल्समधून…”

नवऱ्याला कव्हर करायला गेले तेव्हा…

अतुल मोनेंच्या पत्नी म्हणाल्या, “नवऱ्याला वाचवण्यासाठी मी पुढे गेले. त्यांना कव्हर करत होते. तर त्यांनी बरोबर नवऱ्यालाच गोळी मारली. आप लोगों ने आतंक मचा के रखा है असं ते गोळी मारणारे म्हणाले. अतुलला गोळी लागलेली मी पाहिलं. त्याच्या पोटाला गोळी लागलेली. त्याला छातीला वगैरे गोळी लागलेली नव्हती. हिंदू व मुस्लिम वेगवेगळे व्हा असं आधी बोलले. पण त्यांना कोणीच प्रतिसाद दिला नाही. आम्ही खालीच वाकून राहिलो. सगळ्या माणसांनाच मारलं. घरातल्या कर्त्यांनाच मारलं”. अतुल मोने यांच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. कितीही पैसे, नोकरी दिली तरी ऋचाला तिचे वडील व पत्नीला तिचा नवरा परत मिळणार आहे का? हाही प्रश्न अनुउत्तरितच राहतो.

Tags: trending news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
pahalgam terror attack

“पैसे घेऊन अंबानींच्या लग्नात नाचले त्यांना काश्मीरमध्ये आणून...”, पहलगाम हल्ल्याबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे सरकारला सवाल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.