Jammu Kashmir Pahalgam Terror Attack : मंगळवारचा (२२ एप्रिल) दिवस संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला. जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला असल्याचं वृत्त वाऱ्यासारखं वेगाने पसरलं. पहलगामला फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या सगळ्या भयावह वातावरणात अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. काही रिपोर्ट्सनुसार हा हल्ला मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास झाला. हल्ल्यादरम्यानचे काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे समोर आले. ते पाहून देशभरातील लोकांच्या डोळ्यांत पाणीच आलं. रक्त खवळलं आणि आपण या नराधमांना प्रतिउत्तर कधी देणार? हा प्रश्न सतावू लागला. अशातच आता कलाक्षेत्रातील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे. (pahalgam terror attack Marathi actors reaction)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे निव्वळ हिंदू आहे म्हणून अनेकांवर गोळीबार केला. ना जात विचारली ना भाषा. हे क्रुर कृत्य इथवरच थांबलं नाही. दहशतवाद्यांनी हिंदू आहे का? हे पाहण्या कोणाची पँट काढली, तर कोणातं आधार कार्ड तपासलं. हे कृत्य हृदय पिळवटून टाकणारं आहे. मराठी कलाकारांनी याबाबत विविध पोस्ट शेअर केल्या आहेत. तेजस्विनी पंडित म्हणाली, “अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत. दहशतवाद्यांची जात दरवेळी एकच कशी असते?. हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का?. अशा घटना घडतात तेव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर, इंटेलिजन्सवर विश्वास कसा ठेवायचा?. हे आपल्या भारत सरकारचं अपयश नाही?. त्या हरामखोरांकडून सुधारायची अपेक्षा कधी थांबवणार आपण?. इतक्या हल्ल्यांनंतरही त्यांना त्यांच्या घरात घुसून आपण का मारत नाही?. असे अनेक प्रश्न मनाला भेडसावतात. तुम्हालाही हे प्रश्न पडतात का?”.
अनेक प्रश्न मनात घिरट्या घालत आहेत….
— TEJASWWINI (@tejaswwini) April 22, 2025
दहशतवाद्यांची जात दरवेळेला एकच कशी असते ?
हे हल्लेखोर तिथे स्थानिक मदतीशिवाय पोहोचू शकतात का ?
हिंदू राष्ट्रात, एक हाती हिंदू सरकारात इतर ही नाहीत पण हिंदूच सुरक्षित नाहीत ?
अश्या घटना घडतात तेंव्हा देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर,…
सई ताम्हणकर, सुव्रत जोशी, अभिजीत केळकर अशा कित्येक कलाकारांनी निशेष व्यक्त केला. सरकारकडे न्यायाची मागणी करत निष्पाप जीव गमावल्यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र या सगळ्या कलाकारांच्या मनातही एकच प्रश्न होता की, हे सगळं कधी थांबणार?, कधी आपण या सगळ्या हल्ल्यांना प्रतिउत्तर देणार?. हिंदू म्हणून आपण सुरक्षित नाही आहोत का? हा प्रश्नही अनुउत्तरितच आहे.
आणखी वाचा – “ब्राम्हणांवर मूत्रविर्सजन करेन” म्हणणाऱ्या अनुराग कश्यपची हात जोडून माफी, म्हणाला, “मर्यादा ओलांडून…”

सुव्रत म्हणाला, “आज काश्मीरमधून आलेली बातमी अत्यंत क्लेशदायक आहे. इस्त्राईल पासू काश्मीर पर्यंत जगभरात विविध धर्मातील धर्मांध लोकांनी मांडलेला उच्छाद, एकदाचे सर्व मजहब, religion आणि धर्म वगैरे एकत्र बुडवून एकदाचा संपवावा. कारण एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्याची ही तृष्णा कधीही न संपणारी आहे”. पहलगाम हल्ला ही संपूर्ण देशासाठी मन हेलवणारी घटना आहे.