महाराष्ट्रात त्याहीपेक्षा मुंबईमध्ये महिला कितपत सुरक्षित आहेत? हा प्रश्न सतत भेडसावतो. महिलांवर अत्याचार, अल्पवयीन मुलींवर बलात्कार, रस्त्यावर छेडछाड अशा कित्येक घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचं कानावर येतं. एखादी महिला, मुलगीबाबत विचित्र घटना घडली की, वातावरण तात्पुरता तापतं. राजकीय मंडळीही तापलेल्या वातावरणात आपले हात धुवून घेतात. अधिकाधिक आठ दिवस अत्याचाराच्या प्रकरणांची चर्चा सुरु राहते. मात्र नंतर सगळं जैसे थे. आरोपीला नवा गुन्हा करण्याची उमेद मिळते. त्याचबरोबरीने वाईट वृत्तीच्या लोकांना आणखी वाईट कसं वागता येईल यासाठी प्रोत्साहन मिळतं. मात्र आपल्याच घरातील स्त्रिया आज असुरक्षित आहेत याचा कोणीच विचार करु नये?. सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तर डोकंच सुन्न झालं. (Mumbai woman harassed by man in auto rickshaw)
वांद्रे परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑफिस सुटल्यानंतर एक महिला रिक्षाने घरी जात होती. रिक्षा थांबली असता शर्टलेस अज्ञात व्यक्ती तिच्या रिक्षाजवळ आला. तिथे तो व्यक्ती तिला त्रास देऊ लागला. खाण्यासाठी तो महिलेजवळ भीक मागत होता. त्या महिलेने त्याच्याकडे लक्ष देणंच टाळलं. महिलेने आपल्याकडे लक्ष दिलं नाही हे जाणवताच त्याची वागणूक बदलली.
आणखी वाचा – ३६व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याची आत्महत्या, राहत्या घरी मृत अवस्थेत पाहिल्यानंतर…; कुटुंब हादरलं
अज्ञात व्यक्तीला राग आला. त्याने रिक्षामध्ये बसलेल्या महिलेची मांडीच पकडये बसलेल्या महिलाक्षामध्ये बसललली. इतकंच नव्हे तर घाणेरड्या भाषेत नको नको ते तो बोलू लागला. या संपूर्ण प्रकारामध्ये ती महिला गोंधाळून गेली. स्वतःला सावरल्यानंतर तिने थोडंफार कॅमेऱ्यामध्ये कैद केलं. तिने हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियाद्वारे शेअर केला. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अज्ञात व्यक्ती नको ते बोलत आहे. तसेच अंगावर थुंकत आहे. महिलेने तिच्याबाबत घडलेल्या घटनेविषयी पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा – चुलत भावाबरोबर शारीरिक संबंध, घाणेरडं मासिक पाहून जे केलं…; सुप्रसिद्ध गायकाचे धक्कादायक खुलासे
महिलेला स्पर्श केल्यानंतर तिने उलटून उत्तर दिलं. नशेमध्ये असलेला अज्ञात व्यक्ती म्हणाला, “कोणीही तुला स्पर्श करावा असं तुला वाटत नसेल तर पूर्ण कपडे परिधान कर. हा भारत देश आहे. मी काहीही करु शकतो”. महिला पूर्णपणे घाबरली. दरम्यान सिग्नल सुटल्यानंतर तिची रिक्षा पुढे निघून गेली. ही घडलेली घटना मुंबई पोलिसांच्याही नजरेस आली. त्यांनी महिलेला मदतीचं आवाहन करत तिच्याबरोबर घडलेल्या संपूर्ण घटनेची नोंद करुन घेतली.