किम कार्दशियन आणि तिचं संपूर्ण कुटुंब कायमच चर्चेत असतं. आता ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. पण यावेळी ती तिचा पूर्वाश्रमीचा पती कान्ये वेस्टमुळे चर्चेत आली आहे. कान्ये व किमचं नातं कायमचं संपलं आहे. पण त्याच्या वागणूकीमुळे मात्र अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. कान्येने त्याच्या शारीरिक संबंधांबाबत उघडपणे भाष्य केलं. मात्र त्याचं हे प्रकरण चांगलंच गाजत आहे. चुलत भावाबरोबरच संबंध असल्याचं कान्येने सांगितलं. रॅपर कान्येने त्याचं नवं गाणं प्रदर्शित करताना हा संपूर्ण किस्सा सांगितला. मात्र त्याच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. (Kanye west relations with male cousin)
भावाबरोबरच शारीरिक संबंध
कान्येने पोस्टमध्ये अनेक धक्कादायक दावे केले आहे. कान्येने २४वेळा ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. इतकं यश मिळालं असतानाही त्याचं विचित्र वागणं का असेल? हा प्रश्नच आहे. दिवंगत आईचे डर्टी मासिक तो लहान वयातच वाचायचा. त्याने असंही सांगितलं की, ते मासिक चुलत भावाला त्याने दाखवलं. शिवाय मासिकामध्ये जे काही चित्र दाखवण्यात आलं त्याप्रमाणे त्याने सगळं त्याच्या भावाबरोबर केलं.
भावच आता तरुंगात
वेस्टने सांगितलं की, “माझं हे नवं ‘कजिन्स’ गाणं चुलत भावाच्या जीवनावरच आधारित आहे. गरोदर महिलेच्या हत्या प्रकरणात तो आता तुरुंगात आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे”. पुढे तो म्हणाला, “वयाच्या सहा वर्षातच मी डर्टी मासिक पाहिलं. आणि त्यामध्ये जे काही पाहिलं ते मी माझ्या भावाबरोबर केलं. अगदी कमी वयामध्ये हे सगळं मी केलं ही माझी चुकी होती. ती नंतर मला समजली”.
पुढे कान्ये म्हणाला, “माझ्या वडिलांजवळ प्ले बॉयचं मासिक होतं. पण आईच्या कपाटावर वेगळंच मासिक होतं जे आम्ही पाहत होतो. वयाच्या १४ वर्षांपर्यंत मी माझ्या चुलत भावाबरोबर हे करत राहिलो. आम्ही किस करतानाचे दृश्य पाहिले. पुन्हा शारीरिक संबंध आम्ही सुरु ठेवले”. कान्येने केलेले खुलासे साऱ्यांनाच थक्क करणारे आहेत.