काही अभिनेते असे असतात, जे त्यांच्या रांगडा व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. मराठी चित्रपट व टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेते किरण माने हे त्यातीलच एक नाव. किरण माने यांनी आजवर विविध मालिका व चित्रपटांमध्ये अनेक भूमिका साकारले आहेत. मात्र प्रेक्षक त्यांच्या गावरान अंदाजाचे प्रचंड कौतुक करतात. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील त्यांच्या ‘विलास पाटील’ भूमिकेला विशेष प्रेम मिळाले. मात्र याच मालिकेदरम्यान किरण माने वादाच्या भोवऱ्यात अडकले आणि शेवटी ही मालिका सोडावी लागली. (kiran mane)
पुढे ते ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वत प्रेक्षकांसमोर आले, आणि आपल्या रांगडा अवतार व चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर ते टॉप ५ पर्यंत पोहोचले. आतापर्यंत रांगड्या भूमिकेत दिसणारे अभिनेते किरण माने लवकरच मालिका विश्वात पुन्हा पदार्पण करणार असून कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ या आगामी मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहेत. (kiran mane new role in sindhutai mazi mai)
‘या’ भूमिकेत दिसणार किरण माने (kiran mane new role in sindhutai mazi mai)
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित ‘सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची’ ही मालिका येत्या १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत किरण माने हे सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारणार आहे. किरण यांनी सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो शेअर करत आपल्या भूमिकेची ओळख करून दिली आहे.
शेअर केलेल्या या व्हिडिओसोबत अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेची ओळख करताना म्हणाले, “आपल्या एखाद्या भूमिकेतून आपल्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लई इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय. सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा ‘रियल लाईफ हिरो’. सिंधूताईंच्या आयुष्यातला ‘बाप’माणूस अभिमान साठे !”
पुढे ते म्हणाले, “ज्याकाळात मुलांच्या बरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं. त्याकाळात ‘माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे, तिनं शिकावं, मोठ्ठं व्हावं, तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नांव कमावेल’, हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं ! संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणार्या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या, संकटांचा वर्षाव झाला, पण त्याने हार मानली नाही. ‘फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर… नामाचा गजर सोडू नये !’ या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं !” किरण यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (kiran mane new role in sindhutai mazi mai)
हे देखील वाचा : मराठी सिनेसृष्टीची लकीचार्म का आहे सुचित्रा बांदेकर? स्वतःच उघड केलं गुपित, म्हणाली, “माझ्यावर स्वामींची…”