स्वप्न झपाट्याने पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणसांप्रमाणे कलाकारही झटत असतो. आपल्या कामावर असणारं प्रेम, निष्ठा याच्या जोरावर कलाकार आपली सगळी स्वप्न पूर्ण करतो. मेहनतीच्या आधारे हवं ते मिळाल्यानंतर चेहऱ्यावर दिसणारा आनंद काही औरच. असंच काहीसं सुप्रसिद्ध अभिनेता गौरव मोरेबाबत घडलं आहे. गौरवने कलाक्षेत्रात कामाला सुरुवात केल्यानंतर अनेक स्वप्न पाहिली. आता तो ती स्वप्न हळूहळू पूर्ण करत आहे. गौरवचं आता असंच एक स्वप्न पूर्ण झालं आहे. त्याने हक्काची पहिली गाडी घेतली आहे. त्यादरम्यानचा व्हिडीओ गौरवने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. (Gaurav more new car)
गौरव मोरेची पहिली कार
गौरव सध्या मराठी चित्रपटांच्या कामात व्यग्र आहे. कुटुंबासह त्याच्या अनेक इच्छा तो पूर्ण करत आहे. गाडी घेणं हे त्याच्या स्वप्नांपैकी एक. अखेरीस त्याने स्वतःलाच व कुटुंबाला गाडी गिफ्ट केली आहे. इन्स्टाग्रामद्वारे व्हिडीओ पोस्ट करत ही आनंदाची बातमी त्याने दिली. व्हिडीओ शेअर करत गौरव म्हणाला, “फायनली नवीन गाडी घेतली”. निळ्या रंगाची महागडी कार त्याने घेतली आहे. त्याची ही ड्रिम कारच आहे असं म्हणणं वावगं ठरणार आहे.
विशेष म्हणजे गौरवने गाडी घेतलेली पाहून त्याच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंबातील मंडळींनी एकत्र येत गाडीची पूजा केली. गाडीसह विविध पोझ दिल्या. यावेळी गौरवच्या कारकडे ही सगळी मंडळी कौतुकाने बघत होती. विशेष म्हणजे गौरवच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने गाडीला वाकून नमस्कार केला. कष्टाचं चीज झालं ही भावना यावेळी गौरवच्या चेहऱ्यावर दिसत होती.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा – लग्न न करताच ४९व्या वर्षी अमीषा पटेल गरोदर?, फोटोंमध्ये पोट दिसताच चर्चा, नक्की प्रकार काय?
गौरवचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतक कलाक्षेत्रातील अनेक मंडळींनी यावर कमेंट केल्या आहेत. अभिनंदन भावा, खूप खूप अभिमान, गाडीचा रंग एकच नंबर, भावा आता होऊदे धिंगाणा अशा कमेंट्स कलाकारांनी केल्या आहेत. गौरवचा ‘जयभीम पँथर’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरत आहे. शिवाय त्याच्या इतर चित्रपटांच्या तयारीत गौरव व्यग्र आहे.