पत्रलेखा राव व प्रतिक गांधीची मुख्य भूमिका असलेला ‘फुले’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही सीन वगळण्याचे आदेश दिले. दरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही लांबणीवर गेली. ब्राम्हण समाजाने चित्रपटांतील काही सीन्सवर आक्षेप घेतला. आमच्या समाजाला चुकीचं दाखवण्यात येत आहे असंही सांगितलं. त्यामुळेच चित्रपटाच्या सीन्सला कात्री लागली. मात्र ‘फुले’चा वाद सुरु असताना सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यामध्ये उडी घेतली. त्यांनी ब्राम्हण समाजाबद्दल उघडपणे भाष्य केलं. प्रकरण आणखी वाढल्यानंतर अनुरागने आता जाहिर माफी मागितली आहे. पण अनुराग असं काय म्हणाला?, त्याने लगेचच माफी मागण्यामागचं कारण काय? हे सविस्तर जाणून घेऊया. (phule movie controversy Anurag kashyap)
अनुराग्य कश्यप ब्राम्हण समाजाबद्दल काय म्हणाला?
अनुराग म्हणाला, “ माझ्या आयुष्यातील पहिल नाटक ज्योतिबा व सावित्री बाई फुले यांच्या जीवनावर आधारित होतं. या देशात जातीवाद नसताच तर फुलेंना लढण्याची गरजच लागली नसती. आता ब्राम्हणांना याची लाज वाटते किंवा भारतात असा काही ब्राम्हणांचा समाज आहे ज्यांना हे सगळं समजूनच घ्यायचं नाही. इथे खरं मुर्ख कोण आहे? तुम्हीच सांगा. पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की, देशात आता जातीवाद संपूर्ण संपला आहे. मग ब्राम्हण ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप का घेत आहेत?. तुम्ही मग कोण?, का इतकं त्रास करुन घेता?”.
धमक्या, कुटुंबाला त्रास अन्…
अनुरागच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. त्यांना ट्रोल केलं. “ब्राम्हण तुमचा बाप आहे. तुम्ही त्यांच्यावर जितकं भडकणार तितकं तेच तुम्हाला अधिक करुन दाखवतील”. या कमेंटला उत्तर देत अनुराग म्हणाला, “ब्राम्हणांवर मी मुतणार, तुम्हाला काही त्रास?”. यावरुनच वाद प्रचंड पेटला. अनुरागविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तसेच त्याच्यासह त्याच्या कुटुंबियांनाही जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. प्रकरण हाताबाहेर जातंय कळताच त्यांने माफी मागितली.
अनुराग कश्यपची माफी
अनुराग म्हणाला, “माझी माफी पोस्टसाठी नव्हे तर माझ्या त्या एका कमेंटसाठी आहे. माझी तिच कमेंट व्हायरल करण्यात आली आणि नकारात्मकता पसरवण्यात आली. मुलगी, कुटुंबातील इतर मंडळी, मित्र परिवार यांना बलात्कार व जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत मी वेगळं वक्तव्य केलं नव्हतं. त्यामुळे जे मी बोलून गेलो आहे ते मी पुन्हा खोडून टाकू शकत नाही. तसं मी करणारही नाही. तुम्हाला कोणालाही शिव्या द्यायच्या असतील तर मला द्या. माझ्या कुटुंबाने कोणतंच वक्तव्य केलेलं नाही आणि करतही नाही”. अनुरागच्या माफीनंतर प्रकरण थंडावणार का? हे पाहावं लागेल.