सोशल मीडिया हे अधिक प्रभावी माध्यम मानलं जातं. अनेक व्हिडीओ, कटेंटच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती मिळते. ज्ञानातही भर पडते. परंतू बऱ्याचदा या माध्यमाचा दुरुपयोगही होतो. कलाकारांना याचा सर्वाधिक अनुभव येतो. असंच आता अभिनेते आदेश बांदेकर यांच्याबाबतीत घडलं आहे. आदेश यांच्या आजारपणाबाबत खोटी बातमी सर्वत्र पसरवण्यात आली. इतकंच नव्हे तर त्यांचं निधन झालं असल्याचं बोलण्यात आलं. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. वाईट वृत्तीपोटी केलेली ही कृती होती. याचबाबत आता आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. (Aadesh bandekar fake death news)
आदेश बांदेकरांच्या निधनाच्या खोट्या बातम्या
आदेश बांदेकर व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “नमस्कार, मी आदेश बांदेकर. अत्यंत व्यवस्थित आहे. सुदृढ, सुखरुप प्रवास करत आहे. कारण काळजीपोटी, प्रेमापोटी मला बऱ्याच जणांचे फोन येत आहेत. जे माझ्याशी संपर्क साधू शकत नाहीत ते हळहळ व्यक्त करत आहेत. त्यामागचं कारणही तसंच आहे. आपले खूप हितचितंक असतात. तसंच कोणीतरी अतृप्त भावनेने वेगवेगळ्या बातम्या पसरवतं. आता ही वृत्ती आहे आणि या वृत्तीला कोणी काहीच करु शकत नाही. बातम्या पसरवत असताना आदेश बांदेकरांच्या हृदयाचे ठोके मंदावले इथपासून ते अगदी निधनापर्यंत बातम्या. अगदी श्रद्धांजली वाहण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्याची ही वृत्ती”.
आणखी वाचा – तरीही जिद्द कायम! ८९व्या वर्षी धर्मेंद्र यांची झालीय अशी अवस्था, चालणं कठीण तरीही व्यायम करुन…
काळजीपोटी अनेकांचे फोन
“माझ्यापर्यंत होतं तोपर्यंत ठीक होतं. मी हसण्यावारी या सगळ्या वृत्तीकडे दुर्लक्ष करत होतो. आताच मी सोशल मीडियावरही पाहिलं तेव्हा मनोरंजन क्षेत्रात आताही खूप काम करणाऱ्या दिग्गज कलाकारांबाबत अशाच बातम्या होत्या. कोणाचा घाटात अपघात, संपूर्ण बसलाच अपघात तर कोणी थेट पोहोचवण्यापर्यंत… तर आता बातम्या पसरवणाऱ्यांना पोहोचवण्याची वेळ आली आहे असं मला वाटतं. त्यासाठी ही वृत्ती नाहीशी व्हायला पाहिजे. इतरांच्या नावाचा वापर करुन व्ह्युज वाढवण्यासाठी, चार पैसे कमावण्यासाठीासाठी, चार पैसे कमावण्यासाठी काचा धंदा बंद पाडायला असेल तर जास्तीत जास्त लोकांनी यांना रिपोर्ट केलं पाहिजे”.
आणखी वाचा – १५ वर्ष वेश्याव्यवसाय, आता घरी गेली पण आतमध्ये न घेताच…; ‘ती’चं एकटीचं आयुष्य, मुलाला वाढवण्यासाठी…
वाईट वृत्तीला श्रद्धांजली
पुढे ते म्हणाले, “कारण ही वृत्ती अत्यंत घातक आहे. त्यामुळे नकळत कुटुंबातील कोणाचं तरी नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या वृत्तीला श्रद्धांजली वाहिली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. मराठी मनोरंजन सृष्टीतील वेगवेगळ्या पेजवर २५ ते ३० कलाकारांची निधनाची बातमी टाकणाऱ्या वृत्तीला मी मनापासून श्रद्धांजली वाहतो. हसावं नाहीतर काय करावं… मी मात्र एकदम सुदृढ आहे. ज्यांनी काळजीपोटी मला फोन केला त्या सगळ्यांना सांगतो मी व्यवस्थित आहे”. आदेश बांदेकरांनी संपूर्ण प्रकार सविस्तर रित्या सांगितला आहे.