कोकण म्हणजे स्वर्गसुख. कोकणात राहाणार किंवा कोकणात जाऊन आलेला प्रत्येक माणूस हेच म्हणतो. निसर्गसौंदर्य, विविध फळांनी नटलेलं कोकण सगळ्यांनाच हवहवसं वाटतं. तिथे एखादा व्यक्ती गेला की रमतोच यात दुमत नाही. आता अभिनेत्री ऐश्वर्या नारकरही कोकणात रमल्या आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका संपल्यानंतर त्या अधिकाधिक स्वतःला वेळ देत आहेत. शूट, नेहमीची धावपळ संपल्यानंतर ऐश्वर्या कोकणातील त्यांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी चुलीवर स्वयंपाक केला. विशेष म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी अधिकाधिक वेळ घालवला. याचदरम्यानचा ऐश्वर्या यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (aishwarya narkar recipe video)
आता कोकणात आंबे, काजू, फणस यांचा सीझन सुरु आहे. हेच लक्षात घेता ऐश्वर्या यांनी सगळ्यांसाठी एक वेगळी रेसिपी आणली आहे. त्यांनी काजूच्या बोंडूचं भरीत बनवलं. हे भरीत कसं बनवलं? त्यासाठी लागणारं साहित्य त्यांनी व्हिडीओ शेअर करत दाखवलं. काजूच्या बोंडूचं भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य खालीलप्रमाणे…
१) काजूचे बोंडू
२) मिरची
३) कोथिंबीर
४) मीठ
५) चवीपुरता साखर
६) दही
आणखी वाचा – “आई खूपच काय काय करते” म्हणत मधुराणी प्रभुलकरचे संस्कार काढणारे तुम्ही कोण?
काजूच्या बोंडूचं भरीत बनवण्याच्या प्रक्रिया
१) प्रथम काजूचे बोंडू चिरुन घ्या
२) चिरलेले काजूचे बोंडू कुकुरमध्ये शिजवून घ्या
३) मिठामध्ये मिरची हाताने बारीक करा
४) बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिठामध्ये बारीक केलेली मिरची उकडलेल्या काजूच्या बोंडूमध्ये मिक्स करा
५) आता या संपूर्ण मिश्रणामध्ये दही टाका
६) त्यानंतर गरम तेल किंव तुपामध्ये जिरं टाका
७) तेल गरम झाल्यानंतर काजूच्या बोंडूच्या मिश्रणाला फोडणी द्या. काजूच्या बोंडूचं भरीत तयार.
ऐश्वर्या यांची ही रेसिपी खरंच खूप युनिक आणि पौष्टिक आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. खूप छान रेसिपी, काजूची बोंड बघूनच तोंडाला पाणी सुटलं, रेसिपीबरोबरच तुम्हीही खूप सुंदर दिसत आहात अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.