प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कलाकारांनाही नेहमीच स्ट्रगल काही चुकला नाही. मानसिक, आर्थिक, शारीरिक सुदृढ राहण्यासाठी कलाकारांना तितकीच मेहनत घ्यावी लागते. त्यातही कलाक्षेत्रातलं काम म्हणजे तारेवरची कसरत. सलग हाती काम असल्यास स्थिरता. अन्यथा आर्थिक स्थिरता कलाकारांच्या आयुष्यामध्ये कठीणच. आता या साऱ्या परिस्थितीशी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सामोरं जात आहे. अभिनेत्री चारु असोपाला सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक स्थिरता नसल्यामुळे चारुने लेकीसह थेट मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडीओ तर थक्क करणारे आहेत. पण एवढा मोठा निर्णय घेण्यामागचं कारण नक्की काय? हे आता समोर आलं आहे. (charu asopa rajeev sen)
साडी-ड्रेस विकण्याची वेळ
चारु आता ड्रेस, साडी सोशल मीडियाद्वारे विकण्याचा प्रयत्न करत आहे. ऑनलाइन व्यवसाय ती करत आहे. त्याचप्रकारचे व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. चारुने घटस्फोटानंतर हा निर्णय घेतला आहे. तिच्या व्यवसाय करण्याच्या निर्णयावर काहींनी तिचं कौतुक केलं. पण काहींनी तिला विविध प्रश्नही विचारले. “सुष्मिता सेनची वहिनी असूनही तू हे काम करते” अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. या सगळ्या प्रश्नांचं तिने आता उत्तर दिलं आहे.
हाती पैसेच नाहीत
हिंदुस्तान टाइम्सशी चारुने संवाद साधला. ती म्हणाली, “राजस्थानमधील माझ्या बिकानेर येथील घरी मी शिफ्ट झाले आहे. सध्यातरी मी मुंबई सोडली आहे. माझ्या आई-वडिलांबरोबर आता मी राहत आहे. मला व जियानाला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला आहे”. अगदी विचारपूर्वक हा निर्णय घेतला असल्याचं चारुने सांगितलं. मुंबईमध्ये राहण्यासाठी अधिक पैशांची गरज असल्याचं तिचं म्हणणं आहे.
मुंबईत राहण्यासाठी खूप खर्च
चारु पुढे म्हणाली, “मुंबईत राहणं सोप्प नाही. खूप पैसे खर्च होतात. महिन्या एक ते दीड लाख रुपये खर्च व्हायचे. घराचं भाडं आणि इतर खर्च मिळून ही रक्कम होती. मुंबईच्या बाहेर चित्रीकरण करत असताना मुलीला नॅनीकडे सोडून जाणं मला जमत नव्हतं”. चारुने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीलाही मुंबई सोडण्याच्या निर्णयाबाबत सांगितलं. तो कधीही मुलीला येऊन भेटू शकतो असंही चारु म्हणाली. राजीव व चारुचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच लेकीचा सांभाळ करते. राजीव सुष्मिता सेनचा भाऊ असल्याने हा घटस्फोट चर्चेचा विषय रंगला. पण आता चारु एकटीने मुलीचा सांभाळ अगदी योग्य पद्धतीने करत आहे.