गेल्या काही दिवसांपासून समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो चांगला चर्चेत आहे. या शोमध्ये असलेले स्टँडअप कॉमेडियन, इन्फ्युएन्सरही वादाच्या भोवऱ्यात अडकले. या सगळ्या यादीमध्ये असलेलंच एक नाव म्हणजे अपूर्वा मखीजा. ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अपूर्वा अडचणीत आली. तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं. त्यानंतर अपूर्वा सोशल मीडियापासून दूर झाली. समय रैना, रणवीर अलाहाबादियाच्या वादामध्ये अपूर्वाही अडकली. पण आता तिने या सगळ्या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. युट्यूब चॅनलद्वारे व्हिडीओ शेअर करत अपूर्वाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने कोणकोणते मुद्दे मांडले?, नक्की या सगळ्यामध्ये चुकी कोणाची होती हे जाणून घेऊया. (indias got latent controversy)
अपूर्वाची धक्कादायक विधानं
१) ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये जाणं माझं स्वप्न होतं. शोमध्ये जाणारच असं मला वाटत होतं.
२) पण बरेच दिवस उलटून गेले तरी समयचा फोन आला नाही. त्यामुळे हे स्वप्न स्वप्नच राहाणार असं मला वाटलं.
३) समयला मॅसेज करत मला या शोमध्ये यायचं आहे असं सांगितलं. (दरम्यान अपूर्वाने समय व तिचे व्हॉट्यअप चॅटही दाखवले)
४) मला दुःख आहे. प्रत्येक शब्द मला जपून वापरणं गरजेचं होतं. मला मोठी शिकवण मिळाली आहे. पुढे खूप चांगलं काम करण्याचं मी सगळ्यांना वचन देते. (अपूर्वाने माफी मागितली)
५) संपूर्ण प्रकरण हाताबाहेर गेलं. अपूर्वाच्या विरोधात एफआयआर दाखल झाली. दोन ते तीन महिने काम न मिळणार असल्याचं अपूर्वाच्या मॅनेजरने तिला सांगितलं.
६) संपूर्ण प्रकरणासाठी अपूर्वाने वकील केला. चुकी तुझीच आहे असं वकिलांनी तिला सांगितलं.
७) या प्रकरणामुळे कुटुंबही दुखावलं होतं. पण अपूर्वाच्या पाठीशी सगळे उभे राहिले.
८) वडिलांनी हिंमत दिली. तू प्रसिद्ध झाली आहेस हे सगळं होत राहिल असा विश्वास अपूर्वाला वडिलांनी दिला.
९) टॅरो कार्ड रिडरलाही अपूर्वा भेटली. तुझ्यावर काळी जादू करण्यात आली आहे असं त्यांनी अपूर्वाला सांगितलं. तिनेही त्या सगळ्यावर विश्वास ठेवला. कारण तिच्या म्हणण्यानुसार याचा अनुभव अपूर्वाला आला.
१०) नकारात्मक गोष्टींमुळे तिने स्वतःलाच त्रास देण्याचा निर्णय विचार केला. तिच्या शरीरावर अजूनही त्याच्या खुणा आहेत.
११) नातेवाईकांनीच बदनाम केलं असल्याचा आरोपही अपूर्वाने तिच्या व्हिडीओमार्फत केला आहे.
१२) प्रकरण इतकं वाढलं की, तिला बलात्काराच्या धमक्यांनाही सामोरं जावं लागलं.
‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये अपूर्वाने शरीराच्या खासगी भागांबद्दल भाष्य केलं होतं. त्यानंतर तिला सोशल मीडियाद्वारे विविध धमक्या मिळत होत्या. आता पुन्हा एकदा अपूर्वा तिच्या कामाला नव्या जोमाने सुरुवात करणार आहे.