सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘देवमाणूस’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून बॉलिवूड कलाकारही भारावले, महेश मांजरेकर व रेणुका शहाणेंच्या कामाचं कौतुक

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 10, 2025 | 6:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Devmanus Marathi Movie Trailer

देवमाणूस चित्रपटाचं बॉलिवूड कलाकारांकडून तोंडभरुन कौतुक

मराठीमध्ये सध्या नव्या विषयांवर आधारित चित्रपट येऊ घातले आहेत. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘देवमाणूस’. रेणूका शहाणे व महेश मांजरेकरांची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. अवघ्या काही तासांमध्येच ट्रेलरला लाखो व्ह्युज मिळाले. उत्कंठता वाढवणारी या चित्रपटाची कथा असल्याचं ट्रेलरवरुन लक्षात येतं. आता या चित्रपटाला बॉलिवूडकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी ‘देवमाणूस’चा ट्रेलर सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करत चित्रपटाचं कौतुक केलं आहे. (Devmanus Marathi Movie)

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणलाही या ट्रेलरने भुरळ घातली आहे. त्याचबरोबरीने राजकुमार राव, अर्जुन कपूरनेही तोंडभरुन या चित्रपटाचं कौतुक केलं. लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

आणखी वाचा – “माझ्यावर काळी जादू केली आणि…”, ‘इंडियाज गॉट लेटेंट’बद्दल बोलताना अपूर्वा मखीजाचा धक्कादायक खुलासा, समय रैनाबद्दल म्हणाली…

ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाचं दर्शन घडतं. दमदार अभिनय, क्षणाक्षणांमध्ये बदलणारे भाव, थरार ट्रेलरमध्ये आहे. त्यामुळे हा चित्रपट एक सिनेमॅटिक दृष्ट्या उत्तम ठरणार असल्याचं चित्र दिसतंय. शिवाय ‘देवमाणूस’ची झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे.

आणखी वाचा – प्रेम, अफेअर अन् कौटुंबिक गोडवा; ‘गुलकंद’चा धमाकेदार ट्रेलर, सई ताम्हणकर-समीर चौघुलेची धमाल

मराठीमधील दमदार कथा, खूप दिवसांनी असा ट्रेलर पाहिला, कथा मनोरंजनात्मक असणार अशा विविध भावना प्रेक्षक सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत आहेत. तसेच महेश मांजरेकर व रेणूक शहाणे यांची नवी जोडी म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. तर पोलिसांच्या लूकमधील सुबोध भावेही विशेष लक्ष वेधून घेत आहे. २५ एप्रिलला ‘देवमाणूस’ चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.

Tags: bollywood newsentertainment newsmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Dilip Joshi Struggle Period

१८ महिने बेरोजगार होते 'तारक मेहता…' फेम जेठालाल, कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, "२४ वर्षांच्या अनुभवानंतरही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.