शुक्रवार, मे 23, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आमिर खान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला, लेकाला मिठी मारत उराशी कवटाळलं, नेटकरी म्हणाले, “माणूसकी जपली…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 24, 2025 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Video : आमिर खान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला

Video : आमिर खान संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीला

Aamir Khan Santosh Deshmukh Family Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रभर घडणाऱ्या विविध घटनांमुळे अशांतता पसरली आहे. त्यातीलच एक प्रकरण म्हणजे सरपंच संतोष देशमुख हत्या. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील संतोष यांची डिसेंबर २०२४मध्ये अमानुष हत्या करण्यात आली. हे प्रकरण अजूनही निवळलेलं नाही. संतोष यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचं संपूर्ण कुटुंब झटत आहे. त्यांच्या कुटुंबियांची झालेली अवस्था डोळ्यांत पाणी आणणारी आहे. राजयकीय क्षेत्रातील अनेक मंडळी संतोष यांच्या कुटुंबाला भेट देत आहेत. सांत्वन करत आहेत. दरम्यान आता आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेता आमिर खानने संतोष यांच्या कुटुंबियांना भेट दिली आहे. ही भावनिक भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

संतोष देशमुखांच्या लेकाला भेटताच आमिर खान भावुक

आमिरने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसह पुण्यात संतोष यांच्या कुटुंबासह त्यांच्या मुलाचीही भेट घेतली. त्याने संतोष यांचा मुलगा विराज देशमुख याचं सांत्वन केलं. तसेच त्यांचा भाऊ धनंजय देशमुखशीही संवाद साधला. ही भेट अगदी भावनिक होती. आमिरने साधेपणा जपत संतोष यांच्या कुटुंबासह जमिनीवरच बसला. त्यांच्याशी मायेचा संवाद साधला. इतकंच नव्हे तर संतोष यांच्या लेकाला घट्ट मिठी मारली. आमिरच्या या कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

आणखी वाचा – लेकीसाठी जेवण मागितलं, आठ दिवस अडकले अन्…; काश्मीरच्या पूरात मराठी अभिनेत्याची झालेली अशी अवस्था, स्वामींचं नाव घेतलं आणि…

संतोष देशमुखांच्या कुटुंबियांशी भावनिक भेट, पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Amol Taur (@_amol.taur_04)

पुण्यामध्ये बालेवाडी स्टेडियमध्ये पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचदरम्यान आमिरने संतोष यांच्या कुटुंबाल भेटायचं ठरवलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमिरचं कमेंटद्वारे सगळ्यांनी कौतुक केलं आहे. तसेच इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनीही संतोष यांच्या कुटुंबियांची भेट घेणं गरजेचं होतं असं म्हटलं आहे. शिवाय संतोष देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून जोरदार मागणीही केली आहे.

आणखी वाचा – इंडस्ट्रीमध्ये घाण, काम करणाऱ्यांचे हाल अन्…; गणेश आचार्यांकडून धक्कादायक माहिती, सांगितलं काळं सत्य

आमिर खानला माणूसकी आहे, मराठी कलाकारांनी माणूसकी विकली का?, आमिर खानलाही यांचं दुःख कळालं. इतरांना कधी कळणार?, आमिर खानला सलाम, आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, आमिर खानसारखी माणसं महाराष्ट्रात असल्याचा अभिमान आहे. अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभर अशांतता पसरली. जाहिर निषेध व आरोपींना फाशीची मागणी करण्यात आली. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी मिळणार का? हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Tags: aamir khanbollywood newsentertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Vaishnavi Hagawane Death Case
Social

बेडरुममध्ये कॅमेरा, पत्नीबरोबर लाईट सुरु ठेवत शारीरिक संबंध अन्…; हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाणचे काळे धंदे, संपूर्ण प्रकार उघड

मे 23, 2025 | 5:25 pm
Salman Khan
Entertainment

घरापर्यंत पोहोचली, दरवाजाची बेलही वाजवली अन्…; ‘त्या’ महिलेचा सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, घडलं असं की…

मे 23, 2025 | 3:46 pm
dowry death in pune
Social

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच…

मे 23, 2025 | 3:35 pm
Vaishnavi Hagawane Death Case
Entertainment

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

मे 23, 2025 | 12:51 pm
Next Post
‘माझी प्रारतना’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित, प

‘माझी प्रारतना’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, लवकरच प्रदर्शित होणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.