गुरूवार, जून 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं…”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत, म्हणाले, “असा छळ…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 23, 2025 | 12:51 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vaishnavi Hagawane Death Case

“हुंड्याच्या पैशांतून उभारलेली घरंदारं...”, वैष्णवी हगवणे प्रकरणी मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी राज्यभरात संतापाची लाट आहे. अवघ्या विशीत वैष्णवीने तिचा जीव गमावला. शशांक हगवणेसह दोन वर्षांपूर्वी वैष्णवीचं थाटामाटात लग्न झालं. लग्नात ५१ तोळं सोनं, एक फॉर्च्युनर आणि इतर महागड्या वस्तू मुलाला देण्यात आल्या. इतका खर्च करुनही हगवणे कुटुंबियांकडून वैष्णवीला त्रास सुरुच राहिला. या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हगवणे कुटुंबिय राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे नेता होते. आर्थिक परिस्थितीही चांगली असून हुंडा प्रकार त्यांनी स्वीकारला. पण त्यांनी यापुढेही जाऊन कुटुंबातील सूनेचा छळ सुरुच ठेवला. आता या सगळ्या प्रकरणावर कलाकार मंडळीही संताप व्यक्त करत आहेत. (Vaishnavi Hagawane Death Case)

वैष्णवी हगवणे प्रकरणाला आज नवं वळण मिळालं. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना ताब्यात घेण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून दोघंही फरार होते. आता या प्रकरणाला नवी दिशा मिळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. शिवाय गुरुवारी (२२ मे) वैष्णवीच्या १० वर्षीय मुलालाही तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. वैष्णवीच्या मृत्यूनंतर सगळ्याच स्थरातून राग व्यक्त होत आहेत. मराठी कलाकारांनीही या विरोधात आवाज उठवण्यात सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – “प्रकरण दाबलं तर पुन्हा पैसा व पद…”, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं बेधडक वक्तव्य, म्हणाली, “आरोपींना…”

प्रविण तरडे यांनी फेसबुकद्वारे संतापजनक पोस्ट शेअर केली आहे. प्रविण यांनी वैष्णवी हत्याप्रकरणाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी मागणीही केली आहे. तसेच हुंडाबळी विरोधात आवाज उठवण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. प्रविण म्हणाले, “हुंड्याच्या पैशांमधून उभारलेली घरंदारं प्रॉपर्ट्या पेटवून द्या. कुणा बहिणीचा असा छळ सुरु असेल तर पुढे येऊन बोला. समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठिशी आहोत”.

आणखी वाचा – “एका मुलीचा बाप म्हणून…”, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला, “गप्प बसून…”

प्रविण यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटद्वारे आपलं मत मांडलं आहे. बहुतेक मुली भीतीपोटी हा अत्याचार सहन करत आहेत, सासरचे पैसेवाले असले की, माज येतो, असाच आवाज उठवला पाहिजे, हगवणे कुटुंबाला वैष्णवी ताईचा तळतळाट लागेल, हुंडा देणे आणि घेणे दोन्ही गुन्हाच, या प्रकरणावर चर्चा होऊन समाजात बदल घडायला हवा. अशा अनेक कमेंट नेकऱ्यांनी केल्या आहेत. आता वैष्णवीला योग्य तो न्याय मिळणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Tags: marathi actorpravin tardetrending news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
ghabadkund movie
Entertainment

थरार आणि रहस्याचा नवा अनुभव; ‘घबाडकुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता, कलाकारांचा दमदार अभिनय

जून 3, 2026 | 4:00 pm
 richa chadha on japan issue
Entertainment

“भिकारीपणा करु नका”, भारतीय महिलेने जपानमध्ये चोरी करताच सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “गर्दीत…”

जून 3, 2026 | 1:43 pm
 aruna irani cancer
Entertainment

केमोथेरपीला नकार, केस गळतीची भीती आणि…; ७९ वर्षीय सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला दोनदा झाला कॅन्सर, स्वतःच्याच चुकीने…

जून 3, 2026 | 10:14 am
Next Post
dowry death in pune

बापाला शेवटचा फोन अन् लेकीने संपवलं आयुष्य, पुण्यात हुंड्यामुळे आणखी एक बळी, लग्नाच्या एका महिन्यातच...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.