Akshay Kelkar Post : सध्याचं युग हे कलियुग आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. पण कलियुग म्हणता म्हणता आता माणसातली माणुसकीच संपत चाललीय. बरं. या सगळ्याला कारणीभूत काय असेल तर जगभरात प्रख्यात असलेलं, ज्याच्या शिवाय आपला एक दिवसही काढणं कठीण असा सोशल मीडिया. सोशल मीडिया जेव्हा आलं तेव्हा हे प्रभावी माध्यम म्हणून चर्चेत आलं. पण कालांतराने सोशल मीडियाचा गैरवापरही उलगडत गेला. अशी फार कमी माणसं असतील जी सोशल मीडियापासून दूर आहेत. तर बाकी इतरांचा एकही दिवस सोशल मीडियाशिवाय जात नाही. आता तर काय तर सोशल मीडियावर बंधन नसल्याने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. फॉलोवर्स, लाईक्स, व्ह्यूजसाठी लोक कोणत्याही थराला जात आहेत.
सोशल मीडियाचा गैरवापर पाहून आता एक मराठमोळ्या अभिनेत्रीचा उद्रेक झाला आहे. समाजात सध्या घडणाऱ्या भीषण, अमानुष समस्या या सोशल मीडियाच्या अति वापरामुळेच आहेत याला नाकारता येणार नाही. आणि याच सोशल मीडियाच्या गैरवापराला भीषण म्हणत अभिनेता अक्षय केळकरने शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. अक्षयने सोशल मीडियाच्या वापराने उदभवणाऱ्या समस्यांवर तीव्र राग व्यक्त केला आहे.
अक्षयने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “आपण सोशल मीडियावर बंधन घालणं अत्यंत गरजेचं आहे. दर दोन-तीन रीलनंतर एक सॉफ्ट पॉर्न असल्यासारखं रील पॉपअप होतं. अख्ख्या जगासमोर कपडे बदलणे, clevage दाखवणे किंवा मुला-मुलींकडून कंटेंट या नावाखाली काही विचित्र चाळे आणि फॉलोवर्ससाठीची विकृत मेहनत यात असते. सतत उत्तेजित व्हा हे सांगणारा सोशल मीडिया झालाय. खरंतर सोशल मीडिया आजच्या काळात महत्त्वाचं माध्यम आहे, पण तरीही खूप घातक ठरतोय. सिनेमापुरता adult चा टॅग लावायचा आणि या मीडियावरच्या बंधनाच काय?”.
आणखी वाचा – “वेळ अजूनही खराब आहे”, अभिषेक बच्चनच्या दोन्ही हातात घड्याळ पाहून नेटकरी आश्चर्यचकित, म्हणाले, “आईने…”
अभिनेत्याची ही पोस्ट पाहून अनेकांनी त्याच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला आहे. अक्षयने सोशल मीडिया पाहताना काही सेकंदांनी सतत येणाऱ्या पॉर्न टाईप ऍडवर रोष व्यक्त केला आहे. “अगदी खरं बोललात, “खरं आहे. हे सगळं बंद झालं पाहिजे अस मला वाटतंय”, “एकदम बरोबर आहे आणि यावर ही काही नियम असावेत”, “खरंच भीषण”, अशा अनेक कमेंट करत पाठिंबा दर्शविला आहे.