रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् त्या महिलेने थेट आलिया भट्टचा हातच पकडला, रणबीर कपूर धावत आला आणि…; व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2025 | 4:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Alia Bhatt Viral Video

Video : …अन् त्या महिलेने थेट आलिया भट्टचा हातच पकडला, रणबीर कपूर धावत आला आणि…; व्हिडीओ व्हायरल

Alia Bhatt Viral Video : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलिवूड सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. नेहमीच ही जोडी कुठे ना कुठे स्पॉट होताना दिसते. नुकतेच आलिया आणि रणबीर यांनी नुकतीच संजय लीला भन्साली यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली. दोघेही कार्यक्रमस्थळावर पोहोचताच पापाराजींनी त्यांना फोटो आणि व्हिडीओसाठी घेरले. आलिया आणि रणबीरचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशातच आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये, एक महिला चाहती आलियाचा हात धरुन त्यांना थांबवत आहे. यावेळी चाहतीला आलियाकडून सेल्फी हवी होती. या दरम्यान, रणबीर कपूर त्याचे रक्षण करताना दिसला.

व्हिडीओमध्ये असे दिसून आले आहे की, जेव्हा रणबीर आणि आलिया जात आहेत, तेव्हा एक चाहता त्यांच्या जवळ येतो आणि आलियाचा हात धरतो. ती सेल्फीसाठी आलियाकडे विनंती करते. आलिया तिचा हात सोडण्याचा प्रयत्न करते. यानंतर, आलिया हॅलो बोलून पुढे बाहेर पडायचा प्रयत्न करते. यावेळी रणबीर तिचे रक्षण करताना दिसला.

आणखी वाचा – समीर चौघुले व सई ताम्हणकरची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र, ‘गुलकंद’मध्ये धमाल भूमिकेत दिसणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

View this post on Instagram

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दिवसात संजय लीला भन्साळीच्या ‘लव एंड वॉर’ या चित्रपटात कार्यरत आहेत. या चित्रपटात विक्की कौशल देखील दिसणार आहे. संजय लीला भन्साळीच्या वाढदिवसाच्या डिनरमध्ये हे तीनही कलाकार दिसले. आलियाने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केले. यामध्ये त्यांनी संजय लीला भन्साळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्याबरोबर या सेलिब्रेशनच्या पोस्टही केल्या आहेत.

आणखी वाचा – प्रेमामुळे सगळं काही सहन केलं अन्…; गोविंदासह लग्नाला सुनिता यांच्या वडिलांचा होता विरोध, आर्थिक परिस्थितीही नव्हती तेव्हा…

या व्यतिरिक्त त्यांनी विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचे यशाही साजरे केले. यावेळी विक्की कौशलने केक कापला. आलियाने संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या चित्रपटाने २०० कोटी कमावले. आता चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. गंगुबाई काठियावाडी यांच्या भूमिकेत आलियाला खूप प्रेम मिळाले.

Tags: alia bhatt and ranbir kapoorAlia Bhatt Viral Videoentertainment news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Chiki Chiki BooBoom Boo Movie

'चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रसांद खांडेकर, नम्रता संभेरावसह इतर कलाकारांचा दंगा अनुभवायला मिळणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.