रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१३व्या वर्षी लग्न, ३०शी पर्यंत १५ मुलं अन्…; पुरुषांच्या ‘त्या’ वागण्यावर नसिरुद्दीन शाह यांनी केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 25, 2025 | 3:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Naseeruddin Shah Throwback Video

१३व्या वर्षी लग्न, ३०शी पर्यंत १५ मुलं अन्...; पुरुषांच्या 'त्या' वागण्यावर नसिरुद्दीन शाह यांनी केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत

Naseeruddin Shah Throwback Video  : अभिनेते नसीरुद्दीन शाह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ते न पटलेल्या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य करताना दिसतात. सोशल मीडियावरुन ते अनेकदा ट्विट करताना दिसतात. तसेच ते त्यांच्या रागासाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या कामाबाबत कोणीही स्पर्धा करुच शकत नाही. मात्र यावेळी घडलेला प्रकार हा काहीसा विरुद्ध आहे. बरेचदा ते मुलाखतींमध्ये केलेल्या वक्त्यव्यामुळे चर्चेत येतात. यावेळी ही बाब थोडी उलट आहे. नसिरुद्दीन शाह यांची एक जुनी मुलाखत समोर आली आहे, ज्यामध्ये ते स्त्रियांसमवेत पुरुषांच्या विचारांवर असं काही बोलताना दिसत आहेत की प्रत्येकजण त्यांचे कौतुक करत आहे.

नसीरुद्दीन शाह यांच्या एका मुलाखतीतील एक छोटासा भाग व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते स्त्रियांबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. यावेळी ते असं म्हणताना दिसत आहेत की, “माझ्या आजीला १५ मुले होती. त्यापैकी ११ जिवंत राहिले आणि बाकीच्यांनी या जगाचा निरोप घेतला. आता प्रत्येकजण निघून गेला आहे. परंतु १५ मुलांबद्दल मी विचार करतो तेव्हा कळतं १३ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं तेव्हा नाना १५ वर्षांचे होते.

आणखी वाचा – “माझ्यावर दबाव होता आणि…”, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत डॉ. अमोल कोल्हेंचा धक्कादायक खुलासा

नसीरुद्दीन शाह पुढे म्हणाले, “मला वाटते की वयाच्या १४ व्या वर्षी त्यांना पहिला मुलगा वा मुलगी झाली असावी. यानंतर, कमीतकमी १५ वर्षे किंवा ३० वर्षे, केवळ मुलेच जन्माला घालत राहिली. आणि यामध्ये काही विचित्र गोष्ट आहे का? होय, नक्कीच. शरीराच ओझे त्या स्त्रीवर आहे, एका पुरुषाला आपल्या पोटावर वजन बांधून ठेवण्यास सांगा, आणि दररोज वजन वाढवत जा. आपण किती दिवस हे सहन करु शकता ते पाहा”. अभिनेते पुढे म्हणाले, “मी नंतर या सर्व गोष्टींचा विचार केला. मी कबूल करतो की एक वेळ असा होता जेव्हा मी या गोष्टींबरोबर खूप लांब होतो. पुरुषत्व पासून. परंतु हे खूप मोठे गैरवर्तन करणारे आहे. स्त्रियांचा द्वेष करणारी वृत्ती, स्त्रियांना पात्र नाही असे मानणारी वृत्ती, त्यांचा सततचा अपमान. हे किती काळ टिकेल? माहित नाही”.

आणखी वाचा – मादक पदार्थ दिले अन् अत्याचार केला; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, पोलिसात तक्रार दाखल, म्हणाली, “व्हिडीओ दाखवून…”

आता लोकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित इन रेड हार्ट इमोजी शेअर करत व्हिडीओवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच वेळी, एका नेटकऱ्याने लिहिले, “ते कोणत्याही धार्मिक प्रभावाशिवाय उत्तम प्रकारे बोलत आहेत”. तर एकाने लिहिले, “त्यांचा आवाज आणि त्यांचे शब्द दोन्ही सक्षम आहेत”. एकाने लिहिले, ‘आम्हाला या मानसिकतेसह अधिक पुरुषांची गरज आहे”.

Tags: bollywood newsnaseeruddin shahNaseeruddin Shah Throwback Video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Govinda Divorce News

गोविंदाच्या घटस्फोटाबाबत कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा मोठा खुलासा, म्हणाले, "विभक्त होण्यासाठी नोटीस पाठवली अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.