शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या विरोधात तक्रार दाखल, पालकांबद्दल अश्लील गोष्टी बोलणं पडलं महागात

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 11, 2025 | 11:15 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
India Got Latent Controversy

रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या विरोधात तक्रार दाखल, पालकांबद्दल अश्लील गोष्टी बोलणं पडलं महागात

India Got Latent Controversy : विनोदी कलाकार समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो वादात सापडला आहे. या शोच्या नवीन भागात युट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा दिसले. शोमध्ये रणवीर या अलाहबादियाने पालकांच्या जिव्हाळ्याच्या आयुष्यावर भाष्य केले होते. यानंतर तो वादात सापडला.  आता युट्यूबर रणवीर अलाहबादिया सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंटच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल त्याच्याविरुद्ध मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रात आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

इंडियाज गॉट लेटेंट वादाचा मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला.  मुंबई पोलिसांचे डीसीपी झोन ​​९ दीक्षित गेडाम म्हणाले की, “या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे”. रणवीर अलाहाबादिया हा प्रचंड ट्रोल होतो आहे. सोशल मीडियावर रणवीरला लोक प्रचंड ट्रोल करत उपदेशाचे डोस पाजत आहेत. इंडिया गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

आणखी वाचा – रिंकू राजगुरूचा भाजप खासदाराच्या लेकाबरोबरचा फोटो व्हायरल, दोघांना एकत्र पाहून चर्चांना उधाण

Mumbai, Maharashtra | A complaint has been filed against YouTuber Ranveer Allahabadia, social media influencer Apoorva Makhija, comedian Samay Raina and the organisers of the show India's Got Latent. The complaint has been filed with the Mumbai Commissioner and Maharashtra…

— ANI (@ANI) February 10, 2025

NHRC ने अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठवलेल्या नोटिशीमुळे रणवीरच्या अडचणींत भर पडली आहे. युट्यूबला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पत्र लिहिलं आहे आणि हा व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रणवीर अडचणीत सापडला आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

आणखी वाचा – रणवीर अलाहाबादियाचं ‘ते’ आक्षेपार्ह विधान कोणतं?, शेवटी मागावी लागली माफी, प्रकरण तापलं

रणवीर अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे”.

Tags: India Got Latent Controversyranveer allahabadia controversysamay raina comedian
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
Rakhi Sawant On Ranveer Allahbadia 

"त्याला माफ करा", रणवीर अलाहबादियाच्या 'त्या' चुकीनंतरही राखी सावंतचा पाठिंबा, विनंती करत म्हणाली, "तो चुकला पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.