Ranveer Allahbadia Comment : कॉमेडियन समय रैनाचा शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ चर्चेत आहे. हा शो सुरु झाल्यापासून बर्याचवेळा वादातही अडकला आहे. या शोच्या नवीन भागामध्ये, यूट्यूबर आशिष चंचलानी, अपुर्वा मुखिजा, रणवीर अलाहबादीया यासारखे तारे दिसू लागले आहेत. शोमध्ये रणवीर अलाहबादीयाने असा प्रश्न विचारला आहे की सोशल मीडियावर तो टीकेचा धनी झाला आहे. नेटकरी रणवीर अलाहबादियाला ट्रोल करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या वक्तव्याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत. रणवीरला बॉयकॉट करण्याचीही मागणी होत आहे. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला.
रणवीर स्पर्धकाला म्हणाला, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?”, यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना असं म्हणताना दिसतोय, हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत. रणवीरच्या या प्रश्नानंतर सोशल मीडियावर गदारोळ माजला आहे. त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अशातच रणवीरने एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
आणखी वाचा – विक्रांत मेस्सीचा लेक दिसतो इतका क्युट, पहिल्यांदाच दाखवला चेहरा, फोटो समोर
I shouldn’t have said what I said on India’s got latent. I’m sorry. pic.twitter.com/BaLEx5J0kd
— Ranveer Allahbadia (@BeerBicepsGuy) February 10, 2025
रणवीरने माफी मागत असं म्हटलं की, “मी इंडियाज गॉट लेटेंटमध्ये जे बोललो ते मी बोलायला नको होतं. मला माफ करा. माझी टिप्पणी फक्त चुकीचीच नव्हती, तर मजेदारही नक्कीच नव्हती. कॉमेडी मला जमत नाही, मी इथे फक्त सॉरी म्हणायला आलो आहे. जे काही घडलं त्यामागील कोणताही संदर्भ किंवा कोणतेही स्पष्टीकरण देणार नाही. मी इथे फक्त माफी मागायला आलो आहे. माझ्याकडून चूक झाली. मी ते बोलायला नको होतं. पॉडकास्ट सर्व वयोगटातील लोक पाहतात, मला जबाबदारीचं भान नसलेली व्यक्ती व्हायचं नाही. कुटुंब ही शेवटची गोष्ट आहे ज्याचा मी कधीही अनादर करेन. मला या प्लॅटफॉर्मचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करायचा आहे, हेच मी माझ्या अनुभवांमधून शिकलोय. मी निर्मात्यांना व्हिडीओतील असंवेदनशील विधानं हटवण्यास सांगितलं आहे. पुन्हा एकदा मी माफी मागतो, तुम्ही सगळे मला माफ कराल, अशी आशा आहे”.
Nahh man 😭
— CaLM dAdA (@faded_clone17) February 8, 2025
Beerbicep's would you rather are wild 😭😭 pic.twitter.com/GKJGw4BYke
#WATCH | Mumbai: On controversy over YouTuber Ranveer Allahbadia's remarks on a show, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "I have come to know about it. I have not seen it yet. Things have been said and presented in a wrong way. Everyone has freedom of speech but our freedom… pic.twitter.com/yXKcaWJWDD
— ANI (@ANI) February 10, 2025
रणवीर अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे”.