India Got Latent Controversy : विनोदी कलाकार समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो वादात सापडला आहे. या शोच्या नवीन भागात युट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा दिसले. शोमध्ये रणवीर या अलाहबादियाने पालकांच्या जिव्हाळ्याच्या आयुष्यावर भाष्य केले होते. यानंतर तो वादात सापडला. आता युट्यूबर रणवीर अलाहबादिया सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अपूर्व मखीजा, कॉमेडियन समय रैना आणि इंडियाज गॉट लेटेंटच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. इंडियाज गॉट लॅटेंटमध्ये अपशब्द वापरल्याबद्दल त्याच्याविरुद्ध मुंबई आयुक्त आणि महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पत्रात आरोपींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
इंडियाज गॉट लेटेंट वादाचा मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला. मुंबई पोलिसांचे डीसीपी झोन ९ दीक्षित गेडाम म्हणाले की, “या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे”. रणवीर अलाहाबादिया हा प्रचंड ट्रोल होतो आहे. सोशल मीडियावर रणवीरला लोक प्रचंड ट्रोल करत उपदेशाचे डोस पाजत आहेत. इंडिया गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
आणखी वाचा – रिंकू राजगुरूचा भाजप खासदाराच्या लेकाबरोबरचा फोटो व्हायरल, दोघांना एकत्र पाहून चर्चांना उधाण
Mumbai, Maharashtra | A complaint has been filed against YouTuber Ranveer Allahabadia, social media influencer Apoorva Makhija, comedian Samay Raina and the organisers of the show India's Got Latent. The complaint has been filed with the Mumbai Commissioner and Maharashtra…
— ANI (@ANI) February 10, 2025
NHRC ने अर्थात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने युट्यूबला नोटीस पाठवली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठवलेल्या नोटिशीमुळे रणवीरच्या अडचणींत भर पडली आहे. युट्यूबला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पत्र लिहिलं आहे आणि हा व्हिडीओ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रणवीर अडचणीत सापडला आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
आणखी वाचा – रणवीर अलाहाबादियाचं ‘ते’ आक्षेपार्ह विधान कोणतं?, शेवटी मागावी लागली माफी, प्रकरण तापलं
रणवीर अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं आहे. हे पूर्णपणे चुकीचं आहे. भाषण स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे”.