Priyanka Chopra At Brother Wedding : प्रियांका चोप्रा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. लग्नानंतर प्रियांका सिनेसृष्टीत वावरताना दिसली नाही. आणि ती परदेशात स्थित झाली. असे असले तरी प्रियांका अधूनमधून भारतात ये-जा करताना दिसली. आता पुन्हा एकदा प्रियांका भारतात परतली आहे. भावाच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा सध्या मुंबईत आहे. काही दिवसांपूर्वी ती भारतात आली होती आणि त्यानंतर आता भाऊ सिद्धार्थच्या लग्नाच्या विधींचा ती खूप आनंद घेत आहे. भावाच्या मेहंदी सोहळ्यामध्ये प्रियंकाने खूप मजा केली आणि ती बेधुंदपणे थिरकतानाही दिसली. यासह, प्रियांकाच्या सासूनेही या सोहळ्याचा खूप आनंद लुटला आणि आता तिचा पती निक जोनाससुद्धा मुंबईला पोहोचला आहे.
५ फेब्रुवारी रोजी, सिद्धार्थचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्यामध्ये प्रियांका तसेच तिच्या सासूने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाने या मेहंदी सोहळ्याचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये प्रियांकाच्या लूकची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या लूकमधील प्रियांकाच्या नेकलेसची सर्वाधिक चर्चा रंगली. तिने भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या मेहंदी सोहळ्यासाठी या खास नेकलेसने तिचा लूक पूर्ण केला. या हाराची किंमत १२ कोटी रुपये आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिच्या हावर मेहंदी काढून घेताना दिसत आहे. तर तिच्या सासूबाईही त्यांच्या हातावर मेहंदी काढून घेताना दिसत आहेत. आणि तिचे सासरे या खास क्षणांना कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – वयाच्या ३० व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अभिनयाला रामराम, महाकुंभमध्ये स्वीकारली गुरु दीक्षा
प्रियांकाची मुलगी मालती हिनेही तिच्या हातावर मेहंदी काढली आणि मामाच्या लग्नात ती धमाल करताना दिसली. या प्रसंगी, प्रियांका खूप आनंदी होती आणि तिने कुटुंबासह खूप एन्जॉय केलं. ती तिची चुलत बहीण मन्नारा चोप्रा हिच्याबरोबर ‘मुझसे शादी करोगी’ या गाण्यावर थिरकली. प्रियांकाने मेहंदी सोहळ्याच्या फोटोंबरोबर हा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. प्रियांकाच्या भावाच्या लग्नात तिचे सासरे वडिलांची भूमिका बजावत जबाबदाऱ्या सांभाळताना दिसले.
आणखी वाचा – नवा शो मिळताच दीपिका कक्करकडून स्टाफची हकालपट्टी, अभिनेत्रीवर गंभीर आरोप, म्हणाली, “संधी मागितली पण…”
प्रियांकाचे वडील या जगात नाहीत पण तिच्या सासऱ्यांनी त्यांची कमी या लग्नात आणि प्रियांकाच्या आयुष्यात भासू दिलेली नाही. पापाराझींनाही त्यांनी मिठाई देत त्यांचे आभार मानले. प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ नीलम उपाध्यायशी लग्न करत आहे. नीलम एक अभिनेत्री आहे आणि तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिद्धार्थ आणि नीलम एका डेटिंग अॅपद्वारे भेटले. या अॅपमध्ये प्रियांका देखील गुंतवणूकदार होती.