दीपिका कक्कर सध्या सेलिब्रिटी मास्टरशेफचा भाग आहे. आशातच तिचे नाव एका नवीन वादात समोर आले आहे. दीपिकाच्या स्टाफनेच तिच्याबद्दल खळबळजनक खुलासे केले आहेत. दीपिकाची डिझाइनर सानियाने युट्यूबवर व्हिडिओ शेअर करत तिच्याविरुद्ध राग व्यक्त केला आहे. तिने आरोप केला आहे की, दीपिकाने तिची फसवणूक केली. ज्यामुळे ती आता बेरोजगार झाली. सानियाने व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, दीपिकाने तिला तिच्या कपड्यांच्या ब्रँडमध्ये नोकरी दिली. ओण जेव्हा दीपिकाला सेलिब्रिटी मास्टरशेफची ऑफर मिळाली तेव्हा तिने सानियाला नोकरीवरून काढून टाकले. दीपिकाने २०२४ मध्ये तिचा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता. त्यावेळी तिने सानियाला डिझायनर म्हणून कामावर ठेवले. (Deepika Kakkar accused by a designer girl)
सानिया आधी दिल्लीहून तिच्याकडे काम करत होती आणि नंतर ती तिच्याबरोबर काम करण्यासाठी मुंबईला गेली. दीपिकाने तिला तिच्या आईच्या घरी जागा दिली आणि स्वतःची टीम तयार करण्यास सांगितले. आता, सानियाने एक व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये दीपिकाने सेलिब्रिटी मास्टरशेफ मिळताच तिला कसे काढून टाकले याचा खुलासा केला आहे. सानियाने ३५:४४ मिनिटांचा एक YouTube व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने उघड केले की, दीपिका दहाव्या दिवशी तिच्याकडे आली आणि ती कोणतेही काम करत नाही असे सांगून तिला नोकरीवरून काढून टाकले. एवढेच नाही तर दीपिकाने तिला असेही सांगितले की, सानिया कारागिरांना शोधण्यासाठी घराबाहेर पडली नाही.
नवीन व्लॉगमध्ये, सानियाने खुलासा केला की, दीपिका तिच्यावर रागावत असताना ती वारंवार सॉरी म्हणत राहिली. सानियाने सांगितले की, ती इतकी घाबरली होती की, ती रडू लागली आणि तिची प्रकृती आणखी बिकट झाली. सानियाने सांगितले की, ती इतकी घाबरली होती की ती रडू लागली, त्यात तिची तब्येतही बिघडली. रात्री उशिरा, जेव्हा ती स्वतःला शांत करत होती, तेव्हा तिने दीपिकाला मॅसेज पाठवला आणि तिला आणखी एक संधी देण्यास सांगितले. दीपिकाच्या मॅसेजचा स्क्रीनशॉट शेअर करताना सानियाने खुलासा केला की, दीपिकाला शो मिळाल्यामुळे ती नोकरी सोडण्याचा विचार करत होती.
आणखी वाचा – “प्रेक्षकांचे हे ऋण…”, पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशोक सराफांनी मानले आभार, म्हणाले, “केंद्र सरकार…”
दीपिकाच्या मेसेजच्या शेवटी लिहिले होते, ‘मी माझा व्यवसाय बंद करण्याचा विचार करत आहे. कारण मला एक शो मिळाला आहे. अशा परिस्थितीत मी तुम्हाला एवढा मोठा पगार देऊ शकत नाही. एक स्टार्टअप म्हणून, माझ्या काही मर्यादा आहेत. सानियाने सांगितले की, या मॅसेजनंतर तिने दीपिकाला विचारले की, ती तिच्याशी बोलण्यासाठी येऊ शकते का? पण तिने नकार दिला. सानियाने दीपिकाच्या मॅसेजचा आणखी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये दीपिकाने तिची माफी मागितली आहे आणि ती तिला परत कॉल करू शकत नाही असे म्हटले आहे.