सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होताकिंबहुना तो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आदिमानव रस्त्यावर फिरताना दिसत आहे. मुंबईमध्ये अचानक हा आदिमानव दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या व्हायरल व्हिडीओमध्ये, एक माणूस आदिम माणसासारखा पोशाख घातलेला, लांब केस आणि लांब दाढी असलेला, मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्याच्याकडे पाहून तो कोण आहे, हे ओळखणंही कठीण झालं आहे. हा माणूस बग्गी ओढतानाही दिसतो आणि लोक त्याला एक सामान्य माणूस समजून दुर्लक्ष करताना दिसतात. अनेकांकडून हा आदिम माणूस बॉलिवूड अभिनेता आमीर खान असल्याचे म्हटलं गेलं होतं. (Aamir Khan is not a caveman)
पण या व्हायरल व्हिडीओमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर सामान्य लोकांमध्ये एका आदिम माणसासारखा दिसणारा हा माणूस आमीर खान नाही. आमीर खानच्या टीमने याबाबत एक निवेदनही जारी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमीर खानच्या जवळच्या व्यक्तीने असा दावा केला आहे की, रस्त्यावर दिसणारा माणूस हा अभिनेता आमीर खान नाही. शिवाय अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका असा सल्लाही दिला आहे.
Aamir Khan’s Caveman Transformation Video Takes the Internet by Storm .#AamirKhan #Caveman #Mumbai #bollywood #ViralVideo pic.twitter.com/NBZsxsBHWA
— Circle Of Bollywood (@CircleBollywood) January 30, 2025
आदिमानवाच्या माणसाच्या वेषात रस्त्यावर फिरणारा हा माणूस आमीर खान वाटल्याचे कारण या लूकसाठी तयार होतानाचे आमीरचे व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. या फोटो व व्हिडीओमधून अभिनेता केसांचा विग आणि दाढी घातलेला दिसत होता. त्यामुळे हा आदिमानव बॉलिवूड अभिनेता आमीर खान असल्याचं म्हटलं गेलं होतं. यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली होती. पण हा आदिमाणूस आमीर खान नसल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा – गुगलवर आराध्याबद्दल चुकीची माहिती, अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची उच्च न्यायालयात धाव, नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, आमीर खांच्याकमांबद्दल बोलायचे झाले तर त्याचा पुढचा चित्रपट ‘सितारे जमीन पर’ हा आहे. ज्यामध्ये दर्शिल सफारी आणि जिनिलीया देशमुख आहेत. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, तो राजकुमार संतोषी यांच्या ‘लाहोर १९४७’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे, ज्यामध्ये सनी देओल मुख्य भूमिकेत असेल.