बॉलिवूडमधील काही जोडपी आणि त्यांची मुलं ही सोशल मीडियावर कायमच काहींना काही कारणावरुन चर्चेत राहत असतात. बॉलिवूड मधील अश्या लोकप्रिय जोडप्यांपैकी यापैकी एक लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन. हे जोडपे कायम चर्चेत असतंच, पण त्यांची लेक आराध्याही काहींना काही कारणावरुन चर्चेत राहत असते. अशातच आराध्याबद्दल एक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे तिने तिच्याबद्दलच्या खोट्या बातम्यांबद्दल कोर्टात धाव घेतली आहे. (Abhishek and Aishwarya Bachchan Petition in Delhi HC)
खरं तर, एप्रिल २०२३ मध्ये, दिल्ली उच्च न्यायालयाने स्वतः आराध्या बच्चनच्या प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती/पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिले होते. पण हे होऊ शकले नाही. अशातच आता नवीन याचिकेत, आराध्या बच्चनने आरोप केला आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तिच्या आरोग्याबद्दलची दिशाभूल करणारी माहिती/पोस्ट सोशल मीडियावरून पूर्णपणे काढून टाकलेली नाही. त्यानंतर दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने गुगलला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १७ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.
आणखी वाचा – रेवतीच्या लग्नात अचानक विक्रांतची एन्ट्री, भर मंडपात चालवली बंदुक, लीला-एजेमुळे अनर्थ टळणार?
काही दिवसांपूर्वी काही यूट्यूब चॅनेल्सनी आराध्याच्या तब्येतीबाबत अनेक खोट्या बातम्या दिल्या होत्या. यातून आराध्या खूप आजारी असल्याचे सांगण्यात आले. यावर नाराजी व्यक्त करत बच्चन कुटुंबाने २०२३ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि हे व्हिडीओ काढून टाकावेत अशी मागणी त्यांनी केली होती. आता या प्रकरणी पुन्हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. आराध्याच्या याचिकेनंतर न्यायालयाने गुगलला नोटीस बजावली आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयात होणार आहे.
दरम्यान, अभिषेक बच्चन व पत्नी ऐश्वर्या बच्चन यांच्या नात्याबद्दल काही दिवसांपूर्वी अनेक अफवा व बातम्या समोर आल्या होत्या. हे पती-पत्नी विभक्त होणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र या जोडप्याने याबद्दल काहीच अधिकृत भाष्य केलं नव्हतं. अनेक कार्यक्रमांना ऐश्वर्या आपल्या लेकीसह एकटीच जायची. शिवाय काही कार्यक्रमांमध्ये ऐश्वर्याच्या पुढील बच्चन नाव काढून टाकल्याने या चर्चा अधिक झाल्या होत्या.